बीड : महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत आम्ही 21 जिल्ह्यांचा दौरा केला असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलीय. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. रुपाली चाकणकर काल बीडमध्ये होत्या. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा आढाव घेतला आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर बोलत होत्या.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आखली रणनीती, संपर्कप्रमुखांच्या केल्या नियुक्त्या
यावेळी चाकणकर म्हणाल्या, पीडित महिलांच्या न्यायासाठी प्रत्येक जिल्ह्यांत महिला आयोग आपल्या दारीची स्थापना करण्यात आलीय. या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी
योग्य निर्णय घेण्याबाबत सूचना चाकणकर यांनी दिल्या आहेत. काल चाकरणकर अहमदगर जिल्ह्यांत होत्या.
प्रत्येक जिल्ह्यात आयसीसी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे हा त्यांचा अधिकार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय. या कमिटीमार्फत महिलांना योग्य न्याय मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राऊतांविरोधात BJP आक्रमक, हक्कभंग समितीही गठीत; पण राऊतांवर कारवाई करता येणार नाही!
तसेच पीडितेला न्याय देण्यासाठी बीडमध्ये सखी केंद्राच्या माध्यामातून काम सुरु आहे. मात्र, सर्वाधिक बालविवाह बीडमध्ये होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. यामध्ये खोट्या बालविवाहाच्या नोंदी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
त्याचबरोबर गर्भनिधारणाच्या सर्वाधिक केसेस बीडमध्ये आढळून आल्या आहेत. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महिला आयोग सक्षम असल्याचं त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केलंय.
तसेच शाळा, महाविद्यालायांतील मुलींना असुरक्षित वाटल्यास त्यांनी महिला आयोगाच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, असं आवाहनही त्यांनी केलंय.
याप्रसंगी विविध शासकिय अधिकारी, पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, तक्रारदार महिला, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा रुग्णालयसह शहरातील विविध ठिकाणी भेट जनसुनावणीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय येथे भेट देऊन महिला सहाय्यासाठी समुपदेशन केंद्र, भरोसा सेल सह विविध कक्षांची पहाणी केली. तसेच पाहाणी करुन त्यांनी महिला सहाय्य समुपदेशन केंद्र, दामिनी पथक, पिंक पथक, अवैध मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष आदींची माहिती घेतली.