माझ्या लेकराने कोणता गुन्हा केला, प्रेमंच केलं ना…; मृत अमितच्या आईने फोडला टाहो

बारा दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. आम्हाला न्याय मिळत नाही. माझ्या लेकराचा जीव घेणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

Sambhajinagar Honor Killing

Sambhajinagar Honor Killing

Sambhajinagar Honor Killing : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमित मुरलीधर  साळुंके (25) (Amit Muralidhar Salunke) या तरुणाची त्याच्या सासरा आणि मेव्हण्याने निर्घृण हत्या केली. 14 जुलै रोजी इंदिरानगरमध्ये ही घटना घडली. दरम्यान, अद्यापही सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही (Geetaram Bhaskar Kirtishahi आणि चुलत मेव्हणा आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही पसार आहेत. दरम्यान, या हत्येनंतर मृत अमितच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही, ते लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, CM शिंदेंचा टोला 

मृत अमितच्या आईने माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, विद्या आणि अमितने प्रेमसंबंधातून लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोन महिने झाले होते. त्यानंतर आम्ही त्यांना घरी बोलावून त्यांचं रितसर लग्न लावून दिलं. त्यांचा चांगला संसार सुरू होता. मुलीच्या वडिलांना लग्न करून द्यायचं नव्हतं तर आधीच आपली मुलगी घेऊन जायची होती. माझ्या मुलाला मारण्याचा त्यांना काय अधिकार आहे,माझ्या लेकराने कोणता गुन्हा केला, प्रेमंच केलं ना  असा उद्विग्न सवाल अमितच्या आईने केला.

… तर राजकारणातून संन्यास घेणार, प्रफुल पटेलांची मोठी घोषणा, अनेक चर्चांना उधाण 

पुढं बोलताना त्या म्हणाल्या, आपल्या मुलीच लग्न माझ्या मुलाशी होऊ नये म्हणून सुनेच्या बापाचा विरोध होता. त्यानेच पैसे देऊन मुलाला मारून टाकलं. माझ्या मुलाच्या अंगावर आठ वार होते. माझ्या मुलाचा जीव घेणाऱ्यांना फासावर चढवून मला न्याय भेटलाच पाहिजे. बारा दिवस उलटूनही न्याय मिळत नाही. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृत अमितच्या आईने केली.


नेमकं प्रकरण काय?
अमितचे त्याची बालपणी विद्याशी प्रेमसंबंध होते. पण दोघांचे धर्म आणि जात भिन्न होते. विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाला विद्याच्या घरच्यांचा विरोध होता. हा विरोध झुगारून त्यांनी पळून जाऊन एप्रिल महिन्यात लग्न केले. दरम्यान, अमितच्या घरच्यांनी त्यांना स्विकारलं. घरी आल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार चालला होता. मात्र, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने विद्याच्या वडिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी व विद्याचा चुलत भाऊ याच्याशी मिळून 14 जुलै रोजी अमितवर भर रस्त्यात चाकून भोसकले. अमितला घाटी रुग्णायात उपचारासाठी दाखल केले. मात्र, शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version