लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही, ते लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, CM शिंदेंचा टोला
Eknath Shinde : अलीकडेच महायुती (Mahayuti) सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची (Ladaki bahin yojana) घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Electiomn) आधी ही घोषणा झाल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना आणल्याची टीका विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधक हे माझ्या लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ आहेत, अशी टीका शिंदेनी केली.
माझ्या लेकराचा जीव घेणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, मृत अमितच्या आईची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणा केली ह्या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही. त्यांना हाजमोला झाला. माझ्या लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
… तर राजकारणातून संन्यास घेणार, प्रफुल पटेलांची मोठी घोषणा, अनेक चर्चांना उधाण
ते म्हणाले, माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नयेत, ही योजना सुरू होता कामा नये, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, पण सरकार म्हणून आम्ही जेवढा पैसा लागेल तेवढा देऊ, असंही शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, आम्ही कोणताही निर्णय घेतल्यानंतर मागे हटत नाही. आमच्याकडून ‘प्रिटींग मिस्टेक झाली असं म्हणत नाही. चुनावी चुमला होता, असं म्हणत नाही. कारण आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
आमच्या सरकारने महिलांना एसटीच्या तिकिटात 50 टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची मुभा दिली. तेव्हा निवडणुका नव्हत्या. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांच्या विरोधात कोण आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली.
दिल्लीत मुख्यमंत्री शासकीय बैठकीसाठी आले असतांना दोन्ही उपमुख्यमंत्रीही दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळं विधानसभेच्या जागावाटपावर काही चर्चा झाली का, असा सवालही यावेळी शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जागावाटप योग्यवेळी होईल. गेल्या दोन वर्षात महायुतीने जे काम केलं आहे, त्यानुसार महायुतीला यश नक्की मिळेल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.