Download App

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिला अहिल्यानगरात जनआक्रोश मोर्चा; बैठकीत निर्णय

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar News) जिल्हाव्यापी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाचे नियोजनासाठी आज सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय तसेच सर्व जाती जातीधर्मियांची जिल्हास्तरीय बैठक नगर शहराती कोहिनूर मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

स्व.संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सहआरोपी करण्यात यावे, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला त्वरित अटक करावी, बाकी आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात देशमुख कुटुंबासह, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस यांसह सुरुवातीपासून देशमुख कुटुंबांना न्याय देण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला असे सर्वच नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा..पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?

follow us