घरात घुसले, मोबाईल हिसकावला…, महिला सरंपचासोबत घडला भयानक प्रकार

पळून जाताना जखमींना पुन्हा धडा शिकवण्याची आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

News Photo   2026 06 21T150813.750

घरात घुसले, मोबाईल हिसकावला..., महिला सरंपचासोबत घडला भयानक प्रकार

गेल्या काही काळात गुन्हेगारी घटनांनी (Beed) बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता आणखी एका महिला सरपंचाला भयंकर प्रकाराचा सामना करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीची तक्रार केल्याच्या रागातून काहींनी घरात घुसून मारहाण करत धमकी दिली. तसेच दागिने आणि मोबाईल हिसकावून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गेवराई तालुक्यातील नागझरी येथे ही धक्कादायक घटना घडली. सरपंच आश्विनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गाव परिसरातील अवैध वाळू वाहतुकीबाबत यापूर्वीही काही व्यक्तींविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू होती. त्या प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पती नारायण शिंदे यांनाही विविध माध्यमांतून धमक्या दिल्या जात होत्या. नारायण शिंदे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून व्यवसायाने वकील आहेत.

बीड जिल्ह्यात असंघटित क्षेत्र आणि श्रमशक्ती सर्वेक्षणाचा शुभारंभ; माहिती पूर्णपणे गोपनीय असणार

या हल्ल्यात अशोक गाडे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. त्यांना वाचविण्यासाठी धावून आलेले त्यांचे नातेवाईक साईनाथ गाडे यांनाही मारहाणीचा सामना करावा लागला. लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि इतर वस्तूंनी दोघांवरही वारंवार हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. मारहाणीमुळे दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, आरडाओरड ऐकून गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. लोक येताना दिसताच हल्लेखोरांनी तेथून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. घाईगडबडीत एक दुचाकी घटनास्थळीच राहिल्याचेही सांगितले जात आहे. पळून जाताना जखमींना पुन्हा धडा शिकवण्याची आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अशोक गाडे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीचे वाद आणि घटनेतील सर्व परिस्थितीचा तपशील तपासातून समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे औरंगपूर कुकडा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version