Bajrang Sonawane Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. त्यासंदर्भात आपण बोलणार (Sarpanch Santosh Deshmukh Murder) आहोत, पोलीस या प्रकरणात काय-काय करत आहेत. हे सांगणार आहे.
या घटनेची सुरूवात मात्र 28 मे 2024 रोजी सुरू झाली. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रमेश घुलेला अटक झाली, परंतु अनोळखी व्यक्तीला आजपर्यंत पकडलं गेलं नाही. त्यानंतर रमेश घुले समोर आला नाही. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी अवादा कंपनीच्या यार्डात हाणामारी झाली. या खंडणी प्रकरणाची सुरूवात 29 नोव्हेंबर रोजी झाली. कंपनीचं सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं, हा देखील प्रश्न आहे.
कुंभमेळ्यात शेअर बाजार का घसरतो?; मागील 20 वर्षातील धक्कादायक इतिहास काय…
आता पोलीस कोठडीत असणारा आरोपी 29 तारखेला केजमध्ये होता. तेव्हाच खंडणी मागितली होती, हा गुन्हा दाखल झाला असता तर कदाचित संतोष अण्णांचा खून झाला नसता, असं देखील बजरंग सोनवणे म्हणालेत. याला दोषी येथील डीवायएसपी आहेत. आरोपींवर टॉर्चर करून मारल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही घटना साडेतीन वाजता घडली. धनंजय देशमुख तेव्हाच पोलीस स्टेशनला गेले. भावाचं अपहरण झाल्याचं सांगितलं. यावेळी पोलिसांनाच कळालं की बॉडी कुठे आहे ते? यामध्ये पोलीसच सामील आहेत, असा आरोप खासदार सोनवणे यांनी केलाय. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंच्या घरी कराड अन् पोलिसांची बैठक झाली होती, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
Video : तुझी लायकी नाही… पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन…
खंडणी प्रकरणातील आरोपींना 11 ते 31 तारखेपर्यंत कोणी-कोणी मदत केली? असा आरोप सोनवणे यांनी केलाय. हे केस बीड पोलिसांकडून काढून सीआयडीकडे दिल्या गेल्यात. एसआयटी नेमली. कस्टडीत असलेला आरोपी कसा बोलत नाही, फोन कसा सापडत नाही. 24 दिवस पीसीआरमध्ये असलेला आरोपी बोलत कसा नाही, असा थेट सवाल त्यांनी केलाय. पोलीस यंत्रणा गुन्हेच दाखल करून घेत नाही, तुमच्यावर कसला दबाव आहे, लोकप्रतिनिधींसोबत बोललं की, ते म्हणतात की याच्याशी आमचा काहीही संबध नाही, अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केलीय.