‘इम्तियाज जलील निजामाची औलाद’, शिंदे गटाच्या आमदाराची टीका

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नुकतेच औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. यावरून राजकारण तापले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे. इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे, अशा शब्दात शिरसाठ यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रम प्रसंगी […]

Untitled Design (53)

Untitled Design (53)

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नुकतेच औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. यावरून राजकारण तापले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे. इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे, अशा शब्दात शिरसाठ यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रम प्रसंगी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओवेसींसह खासदार जलील यांच्यावर टीका केली आहे. शिरसाठ म्हणाले, ओवेसी हैदराबादचे आहेत व निजाम देखील हैदराबादचे यामुळे आता निजामाने काय केलं हे मला काय माहित. तसेच जलील हे देखील मूळचे हैदराबादचे… म्हणून निजामाने काय केलं हे आपल्याला काय माहिती? जर ते त्यांच्या बापाची भांडत असतील तर त्यात चुकीचे काय ? जे निजामाची औलाद असतील ते विरोध करतील अशा शब्दात आमदार शिरसाठ यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. आम्ही छत्रपतींची औलाद आहे म्हणून औरंगाबादच्या नावाला विरोध करणार.

ज्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हत्या केली. त्यांच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली त्याचे नाव आम्हाला कसे आवडेल? ही मागणी आजची नसून गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आता नामांतर झाले आहे तर आनंद साजरा करा असे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हंटले आहे.

उर्फी जावेदने दिली गुड न्युज, घरी येणार नवीन सदस्य

औरंगजेबाची कबरच घेऊन जा…
औरंगजेब मेला कुठं आणि आला इथं निजायला. कसा आला त्याकाळात माहीत नाही. त्यावेळी तर ऍम्ब्युलन्स पण नव्हती. आता ओवेसी इकडे येतो बिर्याणी खातो आणि कबरीवर जातो. किती त्रास त्यापेक्षा कबर तिकडे घेऊन जा मोकळे व्हा”, असं संजय शिरसाट म्हणाले.

Exit mobile version