Download App

“मी तसं म्हणालोच नव्हतो”, मविआबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवेंनी स्पष्टच सांगितलं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं मी म्हणालो नव्हतो, असे दानवे म्हणाले आहेत.

Ambadas Danve : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीली जोरदार धक्का बसला. शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाची पुरती वाताहत झाली. या निकालानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुका लढा असा सूर लावला आहे. काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही आमदार नेते पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या मुद्द्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या बैठकीत मी काल शिवसैनिकांची ताकद निर्माण झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं मी म्हणालो नव्हतो, असे दानवे म्हणाले आहेत.

“दाल में कुछ काला है” भाजपाकडे मोठी शक्ती तरीही.. अंबादास दानवेंची सडकून टीका

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ३३ जागा निवडून आलो आता तेच मतदार आहे तेव्हा आणि आता. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपदासाठी नाव पुढे गेल असतं तर चार पाच टक्के मतदान वाढलं असतं. त्याचा सर्वांनाच फायदा झाला असता. काँग्रेसमध्ये १० जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. लोकसभा जिंकल्यानंतर अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. निवडणुकीत मनसे कोणाच्या बाजूने आणि विरोधात होते त्यांनी स्पष्ट करावं. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही सुस्पष्ट नसल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. आमच्या पक्षात मात्र तसा विषय नाही असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी विरोधकांना लगावला.

नेमकं काय म्हणाले होते दानवे ?

ठाकरे गटातील गटाकडून विजयी आमदारांची आणि पराभूत झालेल्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काही वेगवेगळ्या भूमिका माडंल्या. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, यावर अंबादास दानवेंनी भाष्य केलं. दानवे म्हणाले की, बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या पाहिजे, असं मत मांडल्याचं दानवे म्हणाले. निवडणूका आघाडीत न लढता स्वबळावर लढल्या पाहिजे, असा प्रकारचा सूर काही पदाधिकाऱ्यांचा होता, असं दानवेंनी सांगितलं.

बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केलं. भलेही आमचे आमदार कमी निवडून आलेले असतील, शिवसेना एका आमदारावर देखील लढलेली आहे. वामनराव महाडिक असो की छगन भुजबळ, हे एकटे लढले होते. शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तर आम्ही 20 आहोत. या 20 आमदारांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी लढवा आणि काम करावं, अशा प्रकारचा निर्धार पक्षप्रमुखांच्या माध्यमातून व्यक्त झाला, असं दानवे म्हणाले.
“मी खूप सहन केलं पण..” दानवेंच्या लेकीला भरसभेत अश्रू अनावर; पतीनं केलेल्या छळाचा पाढाच वाचला..

follow us