“मी खूप सहन केलं पण..”, दानवेंच्या लेकीला भरसभेत अश्रू अनावर; पतीनं केलेल्या छळाचा पाढाच वाचला..

“मी खूप सहन केलं पण..”, दानवेंच्या लेकीला भरसभेत अश्रू अनावर; पतीनं केलेल्या छळाचा पाढाच वाचला..

Kannad Constituency : राज्यात अनेक मतदारसंघात अनेक ठिकाणी हायहोल्टेज लढती होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघात तर पती आणि पत्नीच आमनेसामने आहेत. या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा होत आहे. या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना अश्रू अनावर झाले. संजना जाधव यांनी मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. पती जाधव यांच्याकडून झालेल्या छळवणुकीची आठवण सांगताना भरसभेत त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

कन्नड मतदारसंघात पतीविरुद्ध पत्नी रंगणार सामना; हर्षवर्धन जाधवांनी सासरे दानवेंना घेरले !

माझ्या वडिलांवर वाट्टेल ते आरोप करण्यात आले. परंतु, आम्ही सहन केलं. का सहन केले तर एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात म्हणून सहन केले. पण त्याच जागी जर एखाद्या मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता. परंतु, मुलीचा बाप (रावसाहेब दानवे) आहे म्हणून तो शांत बसला. आपली मुलगी तिकडे नांदतेय म्हणून ते काहीच बोलले नाहीत. आपले तसे संस्कार आहेत.

आई तर म्हणाली होती आता तू घरातून जात आहेस. तू परत येशील तेव्हा तिरडीच आली पाहिजे. त्याप्रमाणे मी संसार केला. पण मला काय मिळालं. मी याबद्दल कधीच कुठे बोलले नाही. पण हे गाव माझं आहे म्हणून मला भरून आलं असं बोलत असताना संजना जाधव यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. सभेतील प्रत्येकालाच त्यांचे शब्द ऐकून गहिवरून आलं होतं. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!

हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर मी खूप सहन केलं. मी लग्न होऊन एकाच महिन्यात घरी आले. वडिलांना सांगितलं. ते म्हणाले, चाळीशी झाली की माणूस सुधारतो. चाळीशी झाली जे सहन केलं त्याचा मोबदला काही मिळाला नाही पण माझ्या जागेवर कुणाला आणलं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणताच संजना जाधव यांना रडू कोसळले.

हर्षवर्धन जाधव अपक्ष रिंगणात

हर्षवर्धन जाधव हे 2009 आणि 2014 असे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत. सुरुवातीला ते मनसेकडून आमदार झाले होते. त्यानंतर 2014 ला ते शिवसेनेकडून निवडून आले. ते कोणत्याच पक्षात रमले नाहीत. 2019 ला ते अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते घेतली होती. त्यामुळे मतविभाजन होऊन चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. यंदाही लोकसभेला ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना फक्त 39 हजार मतेच मिळू शकली होती.

अनेक पराभव झालेले हर्षवर्धन जाधव आता अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. कन्नडच्या निवडणुकीत ट्वीस्ट आला तो हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिंदे यांच्याकडून त्यांना तिकीटही देण्यात आले. त्यामुळे या मतदारसंघात पती, पत्नी, उदयसिंह राजपूत असा तिहेरी सामना रंगणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube