राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्ये (Election) महायुतीतील नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना आपल्याकडं मागत असताना, ती जागा भाजपने आपल्याकडं ठेवली. यावरुन शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर भाजप नते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.
महायुतीत एकमताने जेव्हा जागावाटप झालं, तेव्हा प्रत्येक नेत्याला आपापल्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज होती. सुहास शिरसाट यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर याच मतदारसंघातून अब्दुल सत्तारच्या मुलाला अर्ज भरायला लावायची गरज नव्हती. अब्दुल सत्तार यांना अहंकार होता, त्यांची तुम्ही भाषा बघितली का? माझ्याशिवाय या राज्याचा मुख्यमंत्री ठरू शकत नाही. मी कुत्ता निशाणी घेतली तरी निवडून येईल,अशी अब्दुल सत्तार यांची भाषा होती असं म्हणत दानवेंनी टीका केली.
मराठवाड्यात भाजपची डोकेदुखी वाढली; शिवसेना शिंदे गटाची बंडखोरी
अब्दुल सत्तार यांना आधीच्या निवडणुकीमध्ये अहंकार होता, गवताच्या गंजीवर उभा असलेला माणूस आगीशी खेळणार नाही, असं म्हणत रावसाहेब दावनेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार पलटवार केला. दोन शिवसेना एकत्र यायला हव्यात असं अब्दुल सत्तार म्हणू शकत नाहीत. एवढं मोठं जे उभं केलंय ते सगळं धाडकन खाली येऊन जाईल, अब्दुल सत्तार यांना प्रकाश झोतात राहायचं असतं. कधीतरी काहीतरी स्टंटबाजी त्यांना करायचा असतो असंही दानवे म्हणाले आहेत.
ही सत्तार यांची स्टंटबाजी नाहीतर काय आहे?, त्यांनी चार तारखेला उभं राहून दाखवावं, ते राहणारच नाहीत असं म्हणत दानवेंनी एकप्रकारे अब्दुल सत्तार यांना आव्हानच दिलंय. पॉलिटिकली अब्दुल सत्तार आणि माझं कधीच पटणार नाही, माझ्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात जे काय करायचंय ते करतातच. माझा मतदार लंब्या टोपीचा आहे, त्यांचा मतदार गोल टोपीचा आहे. ते माझ्या ताटात येऊन जरी जेवले तरी त्यांचे लोक मला मत देत नाहीत हे ठरलेलं आहे, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तार यांच्या वोटबँकवर भाष्य केलं.
अब्दुल सत्तारांच लोक एवढं ऐकतात, त्यांच्यामुळेच ते म्हणतात की, मी लोकसभेत पडलो. मग, त्यांना विधानसभेत किती मत मिळाले आणि किती मतांनी ते जिंकून आले? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच, संख्या आणि ताकद जास्त असताना आमच्या मित्रपक्षाने आमच्यावर अन्याय झाला म्हणून जागा गेली असं म्हणणं योग्य नाही. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणं योग्य नाही. माझी आताही खात्री आहे, 4 तारखेला या विषयावर मी बोलेल, 4 तारखेनंतर मला योग्य प्रतिक्रिया देता येईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
