Download App

छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज प्रकरण; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर ताशेरे ओढले, म्हणाल्या…

Supriya Sule On Chatrapati Sambhajinagar Drugs Matter : राज्यात ड्रग्ज आढळून येतंय अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? असा खोचक सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल चढवला जात आहे.

Sharad Pawar : ‘स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला त्याची चिंता करा’; भाजप नेत्याचा पवारांना टोला

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रग्ज प्रकरणातील नावे सांगणार असल्याचं म्हंटले होते. ड्रग्ज प्रकरण हा विषय सामान्य नसून राज्यातील तरुणांसाठीचा घातक आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस ज्याचे नावं सांगणार होते त्यांनी ते नावे जाहीर करावेत, अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे.

‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात

तसेच ही तरुणांसाठी लढाई आपण लढली पाहिजे, असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आलीयं छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

श्रीलंकेनं नेदरलँड्सला नमवलं! 5 विकेट्सनं पराभव; लंकेनं उघडलं खातं…

रसायनाच्या कारखान्यामध्ये तब्बल 200 कोटी किमतीचे ड्रग्ज तयार करण्यात आले होते, तर 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही आढळून आला आहे. काही दिवसांत या कच्च्या मालापासून 300 कोटी रुपयांची ड्रग्ज तयार करण्याची तयारी होती. मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई पूर्ण झाली आहे.

मधोमध पलंग, नवदाम्पत्यानं पकडापकडी खेळायची का?; शहर नियोजनावरुन राज ठाकरेंचा संताप

गुजरात पोलिसांना ड्रग्ज निर्मितीची माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीची खात्री केली. त्यानंतर डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान ही माहिती खरी आढळून आली असून छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची खरी लिंक सापडली आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली.

दरम्यान, राज्यात गुजरात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात येत असल्याचं पाहायला मिळतयं. त्यावरुन आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या कारवाईप्रकरणी काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us