श्रीलंकेनं नेदरलँड्सला नमवलं! 5 विकेट्सनं पराभव; लंकेनं उघडलं खातं…

श्रीलंकेनं नेदरलँड्सला नमवलं! 5 विकेट्सनं पराभव; लंकेनं उघडलं खातं…

Netherlands vs Sri Lanka World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023)मध्ये श्रीलंकेनं (Sri Lanka)सलग तीनवेळा पराभव स्विकारला. तीनवेळा पराभवानंतर श्रीलंकेनं आज अखेर वर्ल्ड कप 2023 मध्ये आपलं खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या (Lucknow)मैदानावर नेदरलँड्सचा (Netherlands) पाच विकेटनं पराभव केला आहे.

Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट

सलग तीनवेळा पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता चौथ्या सामन्यात अखेर टीम श्रीलंकेनं विजय मिळवला आहे. नेदरलॅंड्सने श्रीलंकेला विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं होतं. नेदरलँड्सच्या टीमने सहजासहजी हार मानली नाही. नेदरलँड्सने अखेरपर्यंत लढत देत श्रीलंकेशी झूंज कायम ठेवली.

Photos : नवदाम्पत्य रावघ परिणीतीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा फोटो

त्या सामन्यात श्रीलंकेने 5 विकेट्स गमावून 263 धावांचं आव्हान हे 10 बॉल शिल्लक असतानाच पूर्ण केलं. सदीरा समरविक्रमा हा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. सदीराने नाबाद 91 धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय नेदरलॅंडने घेतला. नेदरलँडचा डाव 49.4 षटकांत 262 धावांवरच आटोपला. एकवेळ नेदरलँड संघाने 91 धावांत सहा विकेट गमावल्या. यानंतर साइब्रांड एंगेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या 135 धावांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत नेले.

ओपनर पाथुम निसांका याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. कुसल परेरा 5 धावा करुन आऊट झाला. कॅप्टन मेंडीस फक्त 11 धावांवर परतला. चरिथ असलंकाने 44 धावा केल्या, तर धनंजया डी सिल्वाने 30 धावा केल्या. सदीरा समलरविक्रमा आणि दुशानन हेमंथा या जोडीने श्रीलंकेला विजयापर्यंत नेलं.

सदीरा समरविक्रमा याने 107 बॉलमध्ये 7 चौकारांच्या जोरावर नॉट आऊट 91 धावा केल्या. दुशानने नाबाद 4 धावांचं योगदान दिलं. नेदरलँड्सकडून आर्यन दत्त याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पॉल व्हॅन मीकरेन आणि कॉलिन अकरमन या एकरमन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube