Download App

ठाकरेंकडून 23 तर वंचितची 12 जागांची डिमांड, अशोक चव्हाणांनी सांगितला जागावाटपाचा फॉर्म्युला

  • Written By: Last Updated:

Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि कोण जागा निवडून आणू शकतो? हेच जागा वाटपाचे खरे समीकरण असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीकडे लोकसभेच्या 12 जागांची मागणी केली आहे. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकजण आपापल्या परीने जागा मागत आहे. शिवसेनेला 23 जागा मिळाव्यात अशी संजय राऊत यांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांना 12 जागा हव्या आहेत. शरद पवार गटाची काही तरी इच्छा असावी. अशी बेरीज केली तर आकडा 48 च्या वर जाईल. कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे, कोण जागा निवडून आणू शकतो, हेच जागावाटपाचे समीकरण असेल, असे अशोक म्हणाले.

Loksabha Election 2024 : संजय निरुपम, मिलिंद देवरांनी उद्धव ठाकरेंना कोंडीत का पकडले ?

हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवलेला नाही. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व निर्णय देईपर्यंत वाट पाहावी लागेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

राहुल गांधींनी आईसोबत बनवला मुरब्बा, म्हणाले, ‘भाजपवाल्यांना हवा असेल तर…’

दिल्लीत काँग्रेसची बैठक
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची दिल्लीत बैठकही झाली. दिल्लीच्या केंद्रीय समितीनेही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची दखल घेतली आहे. राज्यात कोणकोणत्या जागा लढवायला सोयीच्या असतील यावर चर्चा झाली. अशोक चव्हाण म्हणाले की, राजकीय समीकरणाची माहिती आम्ही केंद्रीय समितीला दिली आहे. पक्षातील उर्वरित सदस्यांशी अद्याप बोलणी सुरू असून त्यांचे मत घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

चार दशकं हिंसाचार अन् शांतता, आसाम करारमध्ये नेमकं काय? | Assam News | LetsUpp Marathi

follow us