राहुल गांधींनी आईसोबत बनवला मुरब्बा, म्हणाले, ‘भाजपवाल्यांना हवा असेल तर…’
Rahul Gandhi Video : आज 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑरेंज जाम बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींना जाम बनवण्यात मदत करत आहेत. शिवाय, त्यांनी नेटकऱ्यांना आपल्या स्वयंपाकघराची ओळख करून दिली आहे. यात ते दोघेही मस्त गप्पा मारतांना दिसत आहे. आपल्या जेवणाच्या आवडी-निवडीही त्यांनी शेअर केल्या. सोनिया गांधींना तुर दाळ आणि भात खायला खूप आवडतो असं त्या म्हणाल्या.
‘चंद्रकांत पाटील असतील तर आरक्षण द्यायला ५० वर्षे लागतील’, मनोज जरांगेंचा खोचक टीका
‘माँ, यादें और मुरब्बा’ या शीर्षकाच्या व्हिडिओमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही खानपानावर चर्चा करत आहेत. जाम बनवताना राहुल गांधी म्हणतात, ‘भाजपवाल्यांना जाम हवा असेल तर त्यांना हा जाम मिळू शकतो. यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, – ते हा जाम आमच्यावर फरत फेकतील. यानंतर राहुल हसायला लागले आणि म्हणाले, ‘बरे झाले, आम्ही ते पुन्हा उचलू शकतो.’
‘प्रकल्प बंद पाडण्यासाठी आदित्य ठाकरेंनी प्रयत्न केले’; नितेश राणेंचा आरोप
व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी संत्री तोडण्याची, सोलण्याची आणि त्यातून मुरब्बा तयार करण्याची रेसिपी सविस्तरपणे सांगितली आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ‘ही माझी बहिण प्रियांकाची रेसिपी आहे. प्रियांकानेच ही रेसिपी शोधून काढली. ते फक्त ते तयार करत आहेत.
या व्हिडिओमध्ये सोनिया म्हणतात, ‘तो (राहुल) जिद्दी आहे, मीही जिद्दी आहे. आम्ही दोघेही जिद्दी आहोत. पण, तो खूप गोड, खूप काळजी घेणारा आहे. विशेषतः माझी तब्येत बरी नसताना राहुल आणि प्रियांका दोघेही माझी काळजी घेतात, असं सोनिया म्हणाल्या.
घरी उत्तम जेवण कोण बनवते यावर राहुल गांधींनी सांगितलं की, त्यांची आजी. म्हणजेच सोनिया गांधी यांच्या आई. आजींनी गांधी कुटुंबाच्या काश्मिरी नातेवाईकांकडून अनेक पदार्थ शिकल्याचं ते म्हणाले.
खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, ‘जेव्हा भारतीय व्यक्ती परदेशात जातो, मी आजच्याबद्दल बोलत नाही…. कारण आता सर्वत्र भारतीय रेस्टॉरंट्स आहेत… तुमचा ब्रिटन आणि इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थांशी तालमेळ बसत नाही. तसंच इथे आल्यावर मला जुळवून घ्यायला वेळ लागला.
राहुल म्हणाले की, तिला (सोनिया) लोणचीही आवडत नव्हती पण आता तिला लोणची खूप आवडतात. सोनिया गांधी म्हणाल्या, मी जेव्हाही परदेशातून येते, तेव्हा मला तूर दाल आणि भात हवा असतो.
व्हिडिओमध्ये, राहुल गांधींनी महात्मा गांधीजींच्या भोजनाकडे बघण्याच्या दृष्टीकोणावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, महात्मा गांधींना पौष्टिक आहाराबद्दल भरपूर ज्ञान होते. माझाही पौष्टीक आहाराबाबत स्वत:चे मत आहे. या व्हिडिओच्या शेवटी दोघेही काचेच्या बरणीत मुरब्बा भरताना दिसत आहेत. या बरणीवर टॅग लावून आहे. त्यावर लिहिलं की, ‘विथ लव्ह, फ्रॉम सोनिया आणि राहुल’.