Download App

तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला

तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.

RanaJagjitsinha Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झालीयं. अशातच तुळजापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील (RanaJagjitsinh Patil) यांनी प्रचारादरम्यान, नागरिकांशी संवाद साधून विकासाचा आराखडाच मांडलायं. तसेच तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असं आवाहनही राणा जगजितसिंह पाटील यांनी केलंय.

उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री मोदी-शाहांनी सांगितला होता; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडला

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुळजापूर मतदारसंघातील तामलवाडी, काटगाव भागात पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून विकासाची प्रेरणा देणारा हा प्रतिसाद आहे. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला वैश्विक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण स्वप्न पाहिले. त्याचा पाठपुरावा केला. केंद्रातील आपले सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने त्याला पाठबळ दिले आणि आता 2 हजार कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं, कॉंग्रेसला महागात पडू शकतं; रश्मी शुक्लांच्या बदलीवरून आशिष शेलार आक्रमक

तसेच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपण बाळगले आहे. त्यामुळे दळणवळणाची सक्षम यंत्रणा उपलब्ध होईल आणि त्यातूनही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे. आपल्या हक्काचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत तुळजाभवानी देवीच्या चरणी दाखल होत आहे. त्यातून 14 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, तामलवाडी येथे 370 एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्यात येणार असून एमआयडीसीला मंत्रिमंडळाने मान्यता दिलीयं. राज्यातील 150 पेक्षा अधिक उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दाखवलीयं. या एमआयडीसीत 12 हजार नोकर्‍या तयार होणार आहेत. त्याचबरोबर अप्रत्यक्ष रोजगाराची संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

follow us