Download App

Vidhansabha Election : राणाजगजितसिंह पाटलांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीचे सारथ्य !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवला आले होते. यावेळी महायुतीचे उमदेवार राणा जगजितसिंह पाटील यांची सीएम शिंदेंच्या गाडीचे सारथ्य केलं.

  • Written By: Last Updated:

Rana Jagjit Singh Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेत्यांच्या प्रचारांना गती आली. दरम्यान, याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंब-धाराशिव महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे (Ajit Pingle) यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज धाराशिवला आले होते. यावेळी महायुतीचे उमदेवार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांची सीएम शिंदेंच्या गाडीचे सारथ्य केलं.

हमीभावाने सोयाबीन खरोदी सुरू करावी; शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार आशुतोष काळे धावले ! 

धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत आणि कळंब धाराशिवचे उमेदवार पिगळे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे आज (दि. 8 नोव्हेंबर) धाराशिव शहरात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाराशिवला आगमन होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी राणा जगतितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे आणि पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. विशेष म्हणजे, सीएम शिंदेंच्या गाडीचे स्टेअरिंग पाटील यांनी आपल्या हातात घेतले. त्यांनी सभास्थळापर्यंत येवोस्तोवर त्यांच्यात राजकीय चर्चा झाली.

महायुतीच्या आमदारांना वनवास भोगावा लागला…
पिंगळे यांच्यासाठी घेतलेल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारच्या काळात कामे मार्गी लावताना अडीच वर्षांच्या काळात राणादादांना आणि महायुतीतील आमदारांना अक्षरशः म्हणून वनवास भोगावा लागला. आपल्या कार्यकाळात आपण किती काम केले आणि त्यांच्या कार्यकाळात किती काम झाले हे पाहिल्यावर विकासाची तळमळ कोणाला आहे हे सहज लक्षात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यभरात सुरू असलेला विकासाचा प्रवाह अखंडित सुरू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून पुन्हा एकदा महायुतीचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात नेत्यांनी केवळ आपले घरं भरण्याचे काम केले. मात्र आम्ही लाडक्या बहीणीसाठी योजना राबवत जनतेची घरं भरण्याची कामं केली. आता पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये देऊ. लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचे आमचे धोरण आहे. आम्ही त्याची अंमलबजावणी केली. लाडकी बहीण योजना राबवतांना विरोधकांनी अडथळे आणले. त्यामुळं लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना जोडा दाखवा आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, पिंगळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मनगटात धनुष्यबाण पकडायला जोर लागतो, तसं योजना बनवायला देखील मजबूत लागतं. वाघाचं कातडं पांघरूण लांडगं वाघ होतं नाही, त्याला वाघच असावं लागतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

follow us