walmik karad call recording with police officer goes viral : मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या वाल्मिक कराडचे (Walmik Karad) एक-एक कारनामे बाहेर येत आहे. पोलिसांबरोबर कॉल झालेल्या संवादाची आणखी एक क्लीप व्हायरल झालेली आहे. एका कार्यकर्त्यावर पोलिसांनी (Police) कारवाई करू नये, यासाठी वाल्मिक कराडने महिला पोलिस अधिकाऱ्याला फोन केला होता. त्यात तो कार्यकर्त्याला म्हणतो घाबरायचे नाही, इथे बाप बसलेला आहे. मी असल्यावर काय चिंता? आता ही व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली असून, वाल्मीक कराड हा आता आणखी अडचणीत आला आहे.
ठाकरेंना धक्का! अहिल्यानगरचे पदाधिकारी करणार जय महाराष्ट्र; मुहूर्तही ठरला
खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा अटकेत आहेत. त्याच्यावर आता मोक्का लावण्यात आलेला आहे. परंतु अद्याप संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आलेले नाही. बीडमधील सनी आठवलेवर कारवाई होऊन नये म्हणून पोलिस अधिकारी शितलकुमार बल्लाळ या फोन केल्याचे क्लीप समोर आली होती. आता दुसरी क्लीप व्हायरल होत आहे. वाल्मिक कराड याला नाशिकमधील एक फोन येतो. अण्णा मी नाशिकमधून बोलतोय, परत पोलिसांचा फोन यायला लागला आहे. सायबर पोलिस स्टेशनमधून फोन येत आहे. त्यावर वाल्मिक कराड हा त्या कार्यकर्त्याकडून एक मोबाइल नंबर घेतो.
“संदीप क्षीरसागर अन् कृष्णा आंधळेचे संबंध..”, धनंजय मुडेंचा पलटवार; राजीनाम्यावरही भाष्य..
त्यानंतर बीड सायबर पोलिस स्टेशनच्या पीएसआय निशिगंधा खुळे यांना फोन करतात. ताई, वाल्मिक कराड बोलतोय. फोन करणारे चिल्लर पोरं आहेत. ते काय करणार आहेत, असे बोलतात. त्यानंतर पीएसआय खुळे म्हणतात, अण्णा पोस्ट डिलिट केली की झालं. वातावरण खराब होत आहे. सगळ्यांना फोन झाले आहेत. त्यानंतर वाल्मिक कराड आणि पीएसआय खुळे यांचा फोन संपतो.
फोन ठेवल्यानंतर वाल्मिक कराड हा समोरच्या कार्यकर्त्याला म्हणतो, इग्नोर करायचे भैय्या, घाबरायचे नाही. इथे बाप बसलेले आहेत. काय घाबरायला लागला आहात ? समोरच्या कार्यकर्ता म्हणतो, तुम्ही आहे म्हणून आम्ही दम धरलेला आहे. ते धमक्या द्यायला लागले होते म्हणून तुम्हाला फोन केला. त्यावर वाल्मिक कराड म्हणतो, सोडून द्यायचे, तुमच्यासमोर बोललो आहे ना स्पीकर ऑन करून. हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी मात्र होऊ शकलेली नाही.