बोबड्या आवाजात ‘आमच्या पप्पांनी गपती आणलायं’ म्हणणारा चिमुरडा नेमका कोण?

मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एका चिमुरड्याचे बोबड्या आवाजातील गाणे मोठ्या प्रमाणा व्हायरल होत आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असेलच पण अनेकांच्या मनात हा चिमुरडा नेमका कोण? त्याचे नाव काय? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा आणि आपल्या बोबड्या शब्दांची भुरळ पाडणारा चिमुरडा नेमका कोण […]

Letsupp Image   2023 09 01T170508.879

Letsupp Image 2023 09 01T170508.879

मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एका चिमुरड्याचे बोबड्या आवाजातील गाणे मोठ्या प्रमाणा व्हायरल होत आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असेलच पण अनेकांच्या मनात हा चिमुरडा नेमका कोण? त्याचे नाव काय? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा आणि आपल्या बोबड्या शब्दांची भुरळ पाडणारा चिमुरडा नेमका कोण आहे ते. (Who Is Amachya Papani Ganpati Analay Viral Song Child)

‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?

बोबड्या आवाजात बाप्पाचं गाणं म्हणणारा कोण?
बोबड्या आवाजात लाडक्या गणपती बाप्पाचं गाणं म्हणणारा या चिमुरड्याचे नाव साईराज केंद्रे असे असून, तो बीड जिल्ह्यातील परळी वैझनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावचा आहे. साईराजचे वय वर्षे अवघे चार वर्षे असून, तो माऊली अनुराधादेवी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

गोंडस बोल अन् हावभावाने जिंकलं करोडोंची मने

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या आमच्या पप्पांनी गपती आणलाय हे गाण सादर करताना साईराजच्या बोबड्या शब्दांनी आणि चेहऱ्यावरील हावभावांनी त्याने करोडो लोकांच्या मने जिंकली आहे. साईराजने सादर केलेल्या या गाण्याला लाखोंमध्ये लाईक्स आणि कमेट्स मिळत असून, अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवात हे गाणे सर्वच गणेश मंडळात वाजताना ऐकू येईल.

अवघ्या ४ वर्षाच्या साईराजच्या या गाण्याने सर्वांना वेडं केले असून, सर्वात पहिले ‘ए आई मला पावसात जाऊ दे” हा साईराजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता साईराजने त्याच्या गोंडस आवाजात आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सादर केले आहे.

Exit mobile version