पुणे-परभणी बसमध्ये थरार; चालत्या बसमध्ये जन्मलेल्या नवजात बाळाला महिलेने खिडकीतून फेकलं

New Born Baby Thrown From Bus :  अचानक प्रसूती वेदनांमुळे बस किंवा ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अशीच काहीशी घटना पुण्याहून परभणीला जाणाऱ्या बसमध्ये घडली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रसुतीनंतर एका 19 वर्षीय महिलने नवजात बालकाला चालत्या बसमधून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात […]

Letsupp Image   2025 07 16T121722.704

Letsupp Image 2025 07 16T121722.704

New Born Baby Thrown From Bus :  अचानक प्रसूती वेदनांमुळे बस किंवा ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अशीच काहीशी घटना पुण्याहून परभणीला जाणाऱ्या बसमध्ये घडली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रसुतीनंतर एका 19 वर्षीय महिलने नवजात बालकाला चालत्या बसमधून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम ९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाथरी-सेलू रस्त्यावर सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

नेमकं काय घडलं?

रितिका नावाची एक महिला संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसमधून अल्ताफ शेख (जो तिचा नवरा असल्याचा दावा करतो) सोबत पुणे ते परभणीला जात होती. प्रवासादरम्यान गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, त्यानंतर संबंधित जोडप्याने नवजात बालकाला कापडात गुंडाळले आणि चालत्या बसमधून बाहेर फेकून दिले.

चालकाला सांगितले उलट्या होत आहे

यानंतर बसचालकाला खिडकीतून बाहेर काहीतरी फेकल्याचे दिसले असता त्याने याबद्दल विचारणा केली त्यावेळी अल्ताफ शेख याने बस प्रवासामुळे त्याच्या पत्नीला उलट्या होत होत असल्याचे सांगतिले. मात्र, रस्त्यावरील एका जागरूक नागरिकाने बसच्या खिडकीतून बाहेर फेकलेली वस्तू पाहिली असता त्यात नवजात बालक असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर कॉल करून घडलेलाय प्रकार सांगितला.

पोलिस चौकशीत सांगितले कारण

मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हालवत गस्तीवरील स्थानिक पोलिसांच्या पथकाने लक्झरी बसचा पाठलाग केला. गाडीतील प्रवाशांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर रितिका आणि शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. चौकशीत बाळाचे संगोपन करू शकत नसल्याने प्रसुतीनंतर बाळाला चालत्या बसच्या खिडकीतून फेकून दिल्याचे जोडप्याने पोलिसांना सांगितले.

पुण्यात दीड वर्षांपासून वास्तव्य

रितिका आणि शेख हे दोघेही परभणीचे रहिवासी असून, गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होते. हे दोघेही पती-पत्नी असल्याचा दावा करत होते, परंतु या दाव्यासंबंधी कोणतेही कागदपत्रे जोडप्याकडून सादर करण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी परभणीतील पाथरी पोलिस ठाण्यात बीएनएसच्या कलम 94 (3), (5) (मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे) अंतर्गत या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version