Download App

मोदी देश चालवतात, साडेतीन जिल्हे नाही : आमदार बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला

Meghana Bordikar on Rohit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी 21 जूनला त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प जूनियर यांची गुरुवारी (२२ जून) भेट झाली. या बैठकीनंतर जेट इंजिनांबाबत ऐतिहासिक करार जाहीर करण्यात आला. मात्र या दौऱ्यावर असताना त्यांनी घेतलेल्या एलन मस्क यांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदींना गुजरात ऐवजी महाराष्ट्रात उद्योग आणवेत अशी विनंती करणारं ट्विट केलं. त्यावर भाजपच्या जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी रोहीत पवारांवर हल्लाबोल केला आहे.
(Meghana Bordikar Critisize Rohit Pawar on PM Modi visit US )

पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

काय म्हणाल्या मेघना बोर्डीकर?

भाजपच्या जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी रोहीत पवारांवर हल्लाबोल हा ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. त्या म्हणाल्या की, नामांकित उद्योजकांच्या घराजवळ जिलेटीन ठेवले की, राज्यात उद्योग वाढतात हे खरं आहे का? असा सवाल करत त्यांनी रोहित पवारांना टॅग केले आहे. तसेच त्यांनी असं देखाल विचारलं की, वसुली सरकारने किती प्रकल्प आणले महाराष्ट्रात? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. पंतप्रधानांना सल्ले देण्याआधी स्वतःची पात्रता बघावी. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर आहे.

पुढे राज्यात देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करताना त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाने FDI मध्ये महाराष्ट्र १ नंबरवर आला. अरे बाबा, मोदीजी देश चालवतायत, फक्त साडेतीन जिल्हे नाही. अशी टीका मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले होते?

मोदींना गुजरात ऐवजी महाराष्ट्रात उद्योग आणवेत अशी विनंती करणाऱ्या या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं हे ट्विट पाहून खूप आनंद झाला. राज्यात बेरोजगारी वाढली असताना गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प अन्य राज्यात आणि तेही प्रामुख्याने गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळं इथल्या युवांचा हक्काचा रोजगार हिरावला गेला. त्यांचं हे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी #टेस्ला च्या प्रकल्पावर स्वाभाविकपणे महाराष्ट्राचाच हक्क आहे.

Ahmednagar Crime : शेवगाव शहर हादरलं! दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

शिवाय येथील पायाभूत सुविधांचा विचार करता टेस्ला सोबत बोलणी करताना महाराष्ट्रच डोळ्यासमोर ठेवून बोलणी करावी. कोणत्याही पंतप्रधानांना परदेशात मिळणारा मान-सन्मान हा त्यांच्या देशातील नागरिकांमुळे मिळत असतो आणि स्वाभाविकच त्यात महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रावर सातत्याने झालेला अन्याय दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण प्रयत्न करावेत, ही राज्याचा एक नागरिक म्हणून आपणास नम्र विनंती! तसंच या प्रकल्पासाठी मुख्यमंत्रीसाहेब आणि उपमुख्यमंत्रीसाहेब आपणही केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, ही विनंती! ‘ असं म्हणत रोहित पवार यांनी ही विनंती केली होती. मात्र त्यावर भाजपच्या जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी रोहीत पवारांवर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us