Mess on Ladaki Bahin Yojana Tatkare points finger at Fadnavis asked about amount : राज्यात आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर (Mahrashtra Budget 2025) झालाय. अजित पवार यांनी कृषी, उद्योग क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी वाढणार, यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. आज देखील यावरून विधानपरिषदेमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी जेव्हा लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे तसेच लाडक्या बहिणींचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मानधनावरून महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी थेट फडणवीसांकडे बोट केलं.
‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा वेळ आणि कष्ट वापरले गेले. त्यांना प्रोत्साहनपर पैसे देण्यात येणार होते. मात्र अद्याप ते देण्यात आलेले नाही. तसेच ते त्यांना 50 रू प्रत्येकी फॉर्म देण्यात येणार होते मात्र ते आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांच्या फॉर्मचे पैसे अंगणवाडी सेविकांना दिले जाणार नाही. मात्र या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं म्हणत रोहित पवारांनी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी थेट फडणवीसांकडे बोट केलं.
कम फॉल इन लव – डीडीएलजे म्यूजिकल। जेना पंड्या आणि अॅशली डे यांचा होळीच्या रंगात नवा अंदाज
तटकरे म्हणाल्या की, आम्ही ही योजना जाहीर केली. त्यावेळी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मानधन मंजूर केले होते. मात्र ते पात्र लाभार्थ्यांच्या फॉर्मचे पैसे मिळणार आहे. तसेच यावेळी येजनेतून नावं वगळण्यात आलेल्या महिलांबाबत स्पष्टीकरण देताना अदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांना इतर योजनांमध्ये 1500 पेक्षा कमी लाभ मिळतो. त्यांना उर्वरित पैसे हे लाडकी बहिण योजनेतून दिले जात आहेत. 20 ते 25 लाख महिलांचा नावं वगळल्याचा आकडा चुकीचा आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच वरूण सरदेसाईंनी जेव्हा माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी वाढणार, यासंदर्भात तटकरे यांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी थेट फडणवीसांकडे बोट केलं.त्या म्हणाल्या की, निवडणुकी पुर्वी अलेल्या असलेल्या लाभार्थ्यांच्या तुलनेत आता फेब्रुवारीमध्ये लाभ घेणाऱ्या महिला जास्त आहेत. तसेच महिलांना 2100 रू देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींचा फसवणूक होणार नाही. याची दक्षता महायुतीचं सरकार घेईल एवढं नक्की. असं उत्तर तटकरे यांनी दिलं.