Aurangzeb Issue : औरंगजेबाचं 300 वर्षांपूर्वी निधन झालंय, झळकवलेले फोटो औरंगजेबाचेच हे कशावरुन? असा खोचक सवाल उपस्थित करीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यात चांगलाच वातावरण तापल्याचं दिसून येतंय. त्यावरुन औवेसी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. (MIM’s Asuddin Owaisi was furious over the Aurangzeb issue)
पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही अगोदर औरंगजेबाच्या फोटोची खात्री करुन घ्या. औरंगजेबाचं 300 वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळे हे फोटो औरंगेजबाचेच आहेत, हे कशावरुन? बाबरी मशीदीच्या विरोधातदरम्यान, आम्हाला बाबरच्या अवलादी म्हटलं होतं, आता आम्हाला औरंगजेबाच्या अवलादी म्हणत असल्याचं औवेसी म्हणाले आहेत.
सोनम कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन, पतीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
सध्या भारतात इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला मुघलांविषयी प्रेम नाही पण इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वाटतंय की लाल किल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बांधला आहे.
तुमच्याजवळ टिपू सुलतानचा फोटो असेल तर तुमच्याविरोधात केसेस होतात. टिपू सुलतानचे फोटो भारताच्या संविधानातही असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप केला जात आहे.
अहमदनगरच्या मुकूंदनगर भागात संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याचं दिसून आलं. त्यानंतर कोल्हापुरातही औरंजेबाच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या. त्यानंतर कोल्हापुरात हिंसाचार घडल्याचं दिसून आलं.
तर अहमदनगरमध्येही एका मोर्चात दोन गटातं तुफान दगडफेक झाली. औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असल्याच्या निषेधार्थ विविध जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
41 तास इंटरनेट ठप्प, 1 हजार कोटी गेले पाण्यात; कोल्हापुरातील राड्याचा साईड इफेक्ट!
या प्रकरणी औरंगजेबाचं उदात्तीकरण इथं खपवून घेणार नसल्याचा पवित्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. या प्रकणातील आरोपींवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आले तरीही काही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती असल्याचं दिसतंय.
अशातच आता एमआयमचे नेते औवेसी यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावर भाष्य करीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. औवेसींच्या भूमिकेनंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसून पुढील काळात तणाव निवळणार की वाढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.