सोनम कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन, पतीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

सोनम दुसर्या एका फोटोमध्ये पती आनंद आहुजासोबत रोमँटिक दिसत आहे.

नुकताच सोनमने लंडनमध्ये 9 जून रोजी 38 वा वाढदिवससाजरा केला.

सोनमने नॅचरल मेकअप, मोकळे केस आणि फक्त कानातले घातले आहेत, यामध्ये सोनम खूपच सुंदर दिसत होती.

सोनमने इस्टाग्रामवर फोटोंसोबतच एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सोनमसोबत सर्व पाहुणे देखील पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये सोनम कपूर तिच्या मुलासोबत दिसत आहे.

आनंद आहुजाने पत्नी सोनमला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये सोनम तिचा मुलगा वायुसोबत दिसत होती.

या फोटोंसह, सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी दोन सुंदर मुले, मित्र, केक, शॅम्पेन, ऑयस्टर, कॅविअर आणि एक परफेक्ट समर डे. रेड ड्रेस घातलेली मुलगी तिच्या वाढदिवशी आणखी काय मागू शकते.

सोनमने तिचा वाढदिवस पती, मुलगा आणि मित्रांसोबत लंडनमध्ये साजरा केला.

यावेळी सोनमने रेड कलरच्या फ्लोअर-लेन्थ ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती, ज्याचा वरचा भाग नेट आणि फ्लोरल एम्ब्रॉयडरीने सजवला होता.
