Kolhapur : जुन्या कामागाराने केली 2 कोटींच्या दरोड्यासाठी मदत; एक टीप अन् दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

Kolhapur : जुन्या कामागाराने केली 2 कोटींच्या दरोड्यासाठी मदत; एक टीप अन् दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूर : येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील धाडसी दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील 2 आरोपींना अवघ्या 36 तासांमध्ये गजाआड केले असून त्यांच्याकडून 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात परराज्यातील आरोपींचाही सहभाग असून उर्वरित मुद्देमाल घेऊन तेच घेऊन गेले आहेत. सध्या या आरोपींचाही शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. (In the case of daring robbery of Katyayani jewellers, the police made a big success and arrested two accused)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या गुन्ह्याचा तपास सुरु असताना, पोलीस निरीक्षक माहदेव वाघमोडे यांना टीप मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी विशाल वरेकर आणि सोनार सतिश पोहाळकर यांनी इतर साथीदारांसोबत मिळून केला आहे. तसेच ते दोघे सध्या विशाल वरेकरच्या कोपार्डे येथील घरी आले आहेत. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही छापा टाकून ताब्यात घेतले.

तुरुंगात झाली ओळख :

विशाल वरेकर हा यापूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी कळंबा जेलमध्ये होता. यावेळी त्याची परराज्यातील एका आरोपीशी मैत्री झाली. मार्च 2023 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांनी मे 2023 मध्ये शेवटच्या आठवड्यात गुन्ह्याचा कट रचला. त्याचप्रमाणे परराज्यातून चार आरोपी हे विशाल वरेकरच्या घरी राहण्यासाठी आले. 3 दिवस रेकी केल्यानंतर दरोडा टाकण्याचे निश्चित झाले.

जुन्या कामगाराने केली मदत :

तर सतिश पोहाळकर हा कात्यायानी ज्वेलर्ससमोरील आंबिका ज्वेलर्समध्ये 2011 ते 2021 असे तब्बल 10 वर्ष कामाला होता. तो सध्या रंकाळा स्टॅन्डसमोर असलेल्या आंबिका ज्वेलर्समध्ये काम करतो. पण हव्यासापोटी तो या गुन्ह्यात सहभागी झाला. दरम्यान, या घटनेनंतर विशाल आणि सतिश यांनी दरोड्यानंतर आरोपींना कात्रजमध्ये सोडून आले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

काय झालं होतं?

8 जूनच्या दुपारी बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्स या सराफी दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. दोन मोटरसायकलवरुन आलेल्या चौघांनी दुकानात शिरून गोळीबार केला आणि दुकान लुटले होते. यावेळी मालक आणि मालकाच्या नातेवाईकावर गोळीबार करण्यात आला होता. पोत्यातून जवळपास 2 कोटी रुपयांचे दागिणे आणि काही लाखांची रोकड असा ऐवज यावेळी दरोडेखोरांनी लांबवला होता. यामुळे कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube