Download App

‘मी कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेच्या स्मरणशक्तीत गडबड’; भुजबळांनी डिवचलं

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal  : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange ) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. हा अल्टिमेटम उद्या संपत आहे. दरम्यान, आज जरांगेंनी बीडमध्ये सभा घेऊन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. येवल्याचा येडपट अशी एकेरी टीका त्यांनी केली. शिवाय, 20 डिसेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण करणार अशी घोषणाही केली. यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मी कोल्हेकुईला दाद देत नाही, अशा शब्दात भुजबळांनी ठणकावलं.

BJP Maharashtra : राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजप सज्ज; विविध कार्यक्रमांचे आयोजन 

आज जरांगेच्या सभेनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आज जाहीर सभा झाली. सभेतील निम्मं भाषणे हे भुजबळांवरच होतं. माझं नाव घेतलं नाही तर मग भाषण करणार तरी काय,? बाकी लेकरं बाळं असं नेहमीचं होतं. काल त्यांनी चर्चा करतांना सगेसोगऱ्यांचा मद्दा घेतला. मात्र, आज तो मुद्दा घेतला नाही. त्यामुळं स्मरणशक्तीत गडबड असल्याचं दिसतं, असा टोला भुजबळांनी लगावला.

शरद पवारांच्या आणखी एका नातवाची होणार राजकारणात एंट्री? कोण आहेत युगेंद्र पवार? 

आज त्यांनी माझ्यावर टीका करतांना मराठ्यांना डाग लावू नका. बीडमधील हॉटेल भुजबळांना जाळलं, असं सांगितलं. याआधी सरकारी अधिकाऱ्यांनी ही जाळपोळ केल्याचं ते म्हणाले…. आणि आता मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, बीडला काय झालं, ते लक्षात ठेवा, असा इशाराही देतात. याचाच अर्थ बीडमधील जोळपोळ मराठ्यांनीच केली, अशी कबुली जरांगे देत आहेत, असं भुजबळ म्हणाले.

जरांगे 20 तारखेपासून आमरण उपोषण करतात, याविषयी विचालं असता भुजबळ म्हणाले, त्यांनी लोकशाही मार्गाने लढलं पाहिजे. मला हौस नाही कुणाला दुखावण्याची. मला माझी जबाबदारी समजेत. मात्र, तुम्ही वाटेल ते बोलत असाल आणि भलकाही मागण्या करत असला तर मला बोलावं लागेल, आरेला कारे उत्तर द्यावंच लागेल, असं भुजबळांनी ठकणावलं.

जरांगेंनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता भुजबळ म्हणाले, छगन भुजबळ असल्या कोल्हे-कुईला दाद देत नाही. मी दादागिरी आणि अन्याचाच्या विरोधात लढत आलो, असं ते म्हणाले.

जातगणना करा
भुजबळ म्हणाले, तीन कोटी मराठे मुंबईत येतील, असं ते म्हणतात. मात्र, सर्व मराठे जरांगेंच्या बाजूने नाहीत. राज्यात पन्नास टक्के मराठा आहे, असं त्यांना वाटतं. त्यात अन्य जातीची टक्केवारी मिळवली तर ती संख्या दीडशे टक्यावर जातं. त्यामुळं जातगणना करा. मग जरांगेंच्या दाव्यांतील खोटेपणा दिसून येईल. कुठल्याच राज्यात एक जात 16-17 टक्क्यांहून अधिक नाही. आणि तसं असेल तर मग जातगणना करा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, अशी मागमी भुजळांनी केली.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे ही दिलासादायक बाब असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Tags

follow us