BJP Maharashtra : राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजप सज्ज; विविध कार्यक्रमांचे आयोजन
BJP Maharashtra : येत्या 22 जानेवारी 2024 ला आयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडून (BJP Maharashtra) देखील तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील उपोषणाच्या घोषणेवर CM शिंदेंचे आवाहन
15 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सात दिवस या विविध कार्यक्रमांची रेलचेलची असणार आहे. यामध्ये 15 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती असणार आहे.
Nana Patekar : ‘नटाचं दुःख अन् सिनेमा……’, नाना पाटेकर यांचा खुलासा, व्यक्त केली खंत
भाजपच्या प्रदेश कार्यालयावर प्रभू श्रीरामांची मोठी फ्रेम श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून रोषणाई देखील करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमाला गायक अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि अभिनेते अरुण गोविंद यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.
शरद पवारांच्या आणखी एका नातवाची होणार राजकारणात एंट्री? कोण आहेत युगेंद्र पवार?
कसा असणार सात दिवसीय सोहळा ?
-15 जानेवारी – उद्घाटन
-16 जानेवारी – सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
-17 जानेवारी – अलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांची भजनाची संध्या
-18 जानेवारी – अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीत
– 20 जानेवारी – रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती
– 21 जानेवारी – कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम
– 22 जानेवारी – पद्मश्री सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम