Download App

पाच वर्षांनी होणार ‘त्या’ 100 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी; मंत्री मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा!

Mangal Prabhat Lodha यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या साहित्य खरेदीमध्ये 100 कोटींचा गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Minister Mangal Prabhat Lodha on inquiry of 100 cores fraud in Directorate of Vocational Education and Training Material Purchase : पाच वर्षांपुर्वी म्हणजे 2021 मध्ये राज्यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या साहित्य खरेदीमध्ये तब्बल 100 कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता. त्यावर चर्चा झाली होती. मात्र पुढे त्यावर काहीही कारवाई झाली नाही. मात्र आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तसे संकेत राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. त्यांनी ही माहिती अधिवेशनामध्ये दिली आहे.

एक चूक व्हिडिओ व्हायरल अन् थेट राजीनामा…नेमकं काय घडलं?

काय म्हणाले मंत्री मंगलप्रभात लोढा?

नुकतेच राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्यावेळी राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेमध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या साहित्य खरेदीतील गैरव्यवहारांबाबत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावर पुढील अधिवेशनापुर्वी अहवाल सादर केला जाणार आहे. लोढा यांच्या या घोषणेमुळे पाच वर्षांपुर्वीच्या घोटाळ्यावरून पडदा उठणार आहे.

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातील चार कर्मचारी तडकाफडकी निलंबित; कारणही धक्कादायक

नेमकं प्रकरण काय?

पाच वर्षांपुर्वी म्हणजे 2021 मध्ये राज्यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या साहित्य खरेदीमध्ये तब्बल 100 कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता. विधान परिषदेमध्ये यावर प्रदीर्घ चर्चा देखील झाली होती. त्यानंतर या प्रकरणातील 3 अधिकाऱ्यांचे निलंबन देखील झाले होते. मात्र त्यानंतर आता यातील विजयकुमार गौतम निवृत्त झाले आहेत. अनिल जाधव आणि योगेश पाटील हे कोणत्याही कारवाई शिवाय अद्यापही कार्यरत आहेत. याप्रकरणी प्रकरणाच्या फाईल्स गायब करणारे प्रदीप शिवतारेंचे निलंबन केले जावे अशी मागणी विधान परिषद सदस्य दादाराल केचे आणि अभिजित वंजारी यांनी केली होती.

follow us