Minister Manikro Kokate and Sanjay Shirsath visit to Shani Mandir During Resignation :राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांवर सध्या गंभीर आरोपांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे आता त्यांची पद जाण्याची देखील शक्यता दाट निर्माण झाली आहे. या प्रत्येकाच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार असताना ही साडेसाती दूर करण्यासाठी यातील अनेकांनी शनिदेवाचे दर्शन घेण्याचा सपाटाच लावला आहे.
नांदणीतील जैन मठातील हत्तीण अंबानींच्या वनताराला का हवीय ? पेटा ते सुप्रीम कोर्ट…
यामध्ये आज सभागृहामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारच्या शनिमांडळ गावात शनीदेवाचं दर्शन घेत आरती देखील केली. विरोधकांकडून त्यांच्या रमीच्या व्हिडिओ नंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांना देखील घेरलं आहे.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
शनिदेवांचं दर्शन घेतल्यानंतर कोकाटे म्हणाले की, राज्यातील दुष्काळ निवारण होवो, सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट होवो आणि चांगले दिवस प्राप्त होवो. तसेच आमच्यासारख्यांच्या जीवनातील संकटं देखील दूर व्हावीत. अशी प्रार्थना मी शनि महाराजांच्या चरणी केली आहे.
अन् माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला कराडचा जेलमधून फोन आला; अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट
या अगोदर देखील कोकाटेंवर अवैधपणे सदनिका लाटल्याच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. तसेच गेल्या काही दिवासांपासून त्यांनी शेतकऱ्यांबाबत विविध वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यावरून देखील वादात सापडलेले आहेत.त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनामेची सोमवारी शक्यता आहे. कारण अजित पवार यांनी या प्रकरणी मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे सोमवारी सर्वांशी चर्चा करून त्याबद्दलचे निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
“सरकारमधील मंत्र्यांवर CM फडणवीस नाराज, अनेकांना डच्चू मिळणार?”, खा. सुळेंचा दावा
त्यानंतर पद जाण्याची शक्यता असलेले आणखी एक मंत्रिमंडळ संजय शिरसाठ यांनी देखील काही दिवसांपूर्वी शनि देवाची पूजा केली होती.या मंत्र्यांच्या या शनि दर्शनावरून देखील विरोधकांनी टोला लगावलाय यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की सरकारमधील अनेक मंत्री आता परमेश्वराचा धावा करत आहेत.असं म्हणत त्यांनी या मंत्र्यांना टोला लागलाय.
शनिशिंगणापूर बोगस कर्मचारी भरती घोटाळा; सुनावणीला मुहूर्त मिळाला
संजय शिरसाठ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती त्यांनी छ. संभाजीनगरमध्ये शेंद्रा एमआयडीसीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे भूखंड घेतला होता. तसेच विट्स हॉटेलच्या निविदा प्रकरणात देखील ते वादात सापडले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांच्या जवळ कथित पैशांची बॅग असल्याचं देखील म्हटलं गेलं होतं. त्यामुळे ते देखील कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.