Tanaji Sawant : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा सुटला नाही. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल, कृपया आत्महत्येचा विचार करू नका, असं आवाहन मराठा बांधवांना केलं.
कागलमध्ये महायुतीचं ठरलं! अजितदादांकडून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा
तानाजी सावंत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या १२ कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द केली. याआधी देखील मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या शेकडो तरुणांच्या कुटुंबाला आपण आर्थिक मदत केल्याचं त्यांनी म्हटलं.
दोन चार महिन्यात विशाल पाटलांना लांब मिशा आल्या…; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
पुढं त्यांनी लिहिलं की, माझ्या ह्या मदतीमुळे किंचित का होईना या कुटुंबाचा भार हलका होईल. वृद्धापकाळातल्या माय-बापाचा आधार गेला, पत्नीने आपला आयुष्यभराचा जोडीदार गमावला, चिमुकली लेकरं पोरकी झाली. या कुटुंबाला शासन मदत करेलच, पण एक कर्तव्याची भावना म्हणून आपल्या समाजासाठी जीव देणाऱ्या या तरुणाच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी आधार देण्याची जबाबदारी आज मी पार पाडत आहे.
ते म्हणाले, माझी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की, कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. मराठा तरुणांच्या आरक्षणाबाबत भावना तीव्र आहेत परंतु त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. न्यायालयाची लढाई चालू आहे, कोणीही हार मानू नये… लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल. कृपया आत्महत्येचा विचार करू नका अशी हात जोडून विनंती करतो, आपल्या परिवाराचा विचार करा, असं आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांना विरोध केला आहे. त्यामुळं आरक्षणाचा तिढा सरकार कसा सोडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.