पुणे : शिंदे सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांचा समावेश होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या काळात या मंत्र्यांना खातेवाटप झाले, मात्र अद्यापही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून मागणी करुनही अद्याप पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करण्यात आलेले नाही, हे फेरवाटप आता लवकरात लवकर करावे, अशी मागणी करत अजितदादांच्या गटातील मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. (Ministers from Ajit Pawar’s group met Deputy Chief Minister Devendra Fadnavis demanding that the post of Guardian Minister be redistributed as soon as possible)
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. जवळपास महिन्याभराहून अधिका काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती संपूर्ण राज्याचा कारभार होता. मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेला उशीर पाहुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर टीकाही सुरू झाली होती. त्यानंतर 9 ऑगस्टला 2022 रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतरही तब्बल महिनाभर पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले नव्हते.
त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले. यात देवेंद्र फडणवीस यांच्या सहा तर बहुतांश मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांचा कार्यभार होता. पुढे जवळपास एक वर्ष मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी शिंदे गटातील आमदार करत होते. अशात अचानक 2 जुलै रोजी अजित पवार यांच्यासह 9 आमदारांची शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून एन्ट्री झाली. त्यानंतर पुन्हा कोण कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होणार याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्यापही पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळेच आता राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव,
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -छत्रपती संभाजीनगर,
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी, धाराशिव,
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर