Download App

3 वर्षांपासून बेपत्ता असलेला वृध्द झळकला सरकारच्या जाहिरातीत, अंधारे म्हणाल्या, ‘हे जाहिरातीबाजी करणारं सरकार…’

तीर्थयात्रा योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता ती व्यक्ती ३ वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Mukhyamnatri Tirtha Darshan Yojana : राज्य सरकारनेुकतीच ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची (Mukhyamnatri Tirtha Darshan Yojana)घोषणा केली. आता या योजनेच्या एका जाहिरातीवरून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. कारण तीर्थयात्रा योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता ती व्यक्ती ३ वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसह (Sushma Andhare) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

नगरकरांनो सावधान! जिल्ह्यात झिकाचा शिरकाव, संगमनेरमध्ये आढळले दोन रुग्ण 

गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे फोटो ‘आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन’ या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने या व्यक्तीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता होते, कुटुंबीयांनीही त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, तांबे कुटुंबीयांना आढळन आले नाहीत. अखेर तीन वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन’ या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबीय अचंबित झाले.

भ्रष्टाचार त्यांच्याकडून अन् वसुली तुमच्याकडून; जयंत पाटलांनी सांगितला रिंगरोडचा AटूZ काळा बाजार

याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, आमचे वडील गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असून आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. मात्र ते सापडला नाही, आता मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत त्यांचा फोटो पाहून आश्चर्याचा धक्का बसला. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे, ही विनंतीही तांबे यांनी केली.

वडेट्टीवारांची सरकारवर टीका
तर विजय वडेट्टीवार यांनी या जाहिरातीवरून सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, सत्ताधाऱ्यांना जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल? महायुतीच्या योजना जश्या पोकळ आहे, तश्याच जाहिराती सुद्धा पोकळ आहे. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावा, असं वडेट्टीवार म्हणाले.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्र्यांनी कितीही कंठशोष करून सांगितलं तरीही हे सरकार सर्वसामान्यांचे नसल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून येते. कारण, हे सरकार जाहिरातीबाजी करणार सरकार आहे. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं हे सरकार आहे. हे सरकार स्वत:च्या जाहिराताीसाठी जनतेच्या भावनांशी खेळतेय हे पुन्हा एकदा सिध्द झालं, अशी टीका अंधारेंनी केली.

follow us