MLA arrives at the session dressed as a leopard : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यभरातील नागरिकांपासून ते राजकारणापर्यंत सगळीकडे सध्या एक विषय चर्चेचा ठरतोय. तो म्हणजे राज्यभरात बिबट्यांच्या (Leopard) हल्ल्यांच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. अहिल्यानगर(Ahilyanagar), जुन्नर(Junnar), नागपूर(Nagpur) आणि आता थेट अलिबागमध्ये (Alibaug) देखील बिबट्यांचे हल्ले झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण तयार झालं आहे. सरकारने या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, या मागणीसह जुन्नरचे आमदार शरद सोनवणे(Sharad Sonwane) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या मुद्द्याची गंभीरता सरकारच्या लक्षात यावी यासाठी ते बिबट्याच्या वेशात अधिवेशनात सहभागी झाले.
नागरिकांमध्ये बिबट्याची एवढी दहशत पसरली आहे, की अंगणाच्या बाजूला सौर कंपाउंड लावून आम्ही आत आलो आहोत. आमची मुलं बाळं आता रस्त्यावर, अंगणात नाहीत, बिबट्याच्या भीतीनं शाळेत जात नाहीत. मला वाटत की, अनेक उपाययोजना करण्यापेक्षा मी वनमंत्र्यांनी हात जोडून विनंती करतो की, तीन महिन्यांच्या आत २००० हजार बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा. 1 हजार मद्य आणि 1 हजार नर तिथं असतील, जेणेकरून नसबंदीचाही विषय देखील मिटेल.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, AI बाबत मोठा निर्णय
वन विभागानं हमी दिल्यानं हे अधिवेशन संपण्यापूर्वी जुन्नर तालुक्यात एक आणि एक अहिल्यानगरमध्ये रेस्क्यू सेंटर बनवून बिबट्याला ट्रॅक करत त्याला बेशूद्ध करत ही मोहिम राबवावी, ही परिस्थिती पाहया यासाठी मायक्रो ऑपरेशनची गरज असल्याचं ते ठामपणे म्हणाले. ‘शेळ्या सोडून ही परिस्थिती सावरणारी नसून मुळात हे प्राणी आता जंगलात राहत नाहीत. हे ऊसात, आमच्या घराच्या जवळ राहत आहेत. त्यामुळं मंत्रीमहोदयांना सल्ले आहेत की आपण मुंबईत फ्लॅटमध्ये राहत असल्यानं तुम्हाला ग्रामीण भागातील परिस्थिती, जनतेची अडचण माहित नाही. महिला भगिनी शेती करताना बाळांवर हल्ले होत आहेत. बिबटचा विषय अतिशय भयंकर असून, ही राज्य आपत्ती घोषित करत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय दिलाच पाहिजे’, अशी मागणी सोनावणे यांनी केली.
बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहिम राज्य शासनानं राबवली पाहिजे. इथून पुढं बिबट्यामुळं एकही बळी सामान्य जनतेला मान्य नाही आणि असा एकही बळी जात असेल तर त्याला आपण सगळे, सरकार जबाबदार आहे, असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ‘प्राणीही महत्त्वाचे आहेत, पण हा प्राणी आता आमच्या घरावर हल्ले करत आहे. हा प्राणी शेड्यूल 2 मध्ये असायला पाहिजे. प्रत्यक्षात हल्ल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यापेक्षा माणूस दगावणार नाही यासाठी निर्णय घ्या’, अशी मागणी सोनावणेंनी उचलून धरली. रेस्क्यू सेंटरच्या कामाला सुरुवात करा आणि 90 दिवसांच्या आत एकही बिबट्या मोकाट दिसणार नाही, मानवी वस्तीत दिसणार नाही यासाठी पावलं उचला अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
धक्कादायक! बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये घोटाळा, किती कोटींचा आहे घोळ?
बिबट वस्तीच्या इथं भींत बांधण्याचा मार्ग फोल ठरला असल्याचं सांगत, ‘2014 ला मी इशारा दिला होता की बिबट वाढणार आहे. 10 वर्षापूर्वीसुद्धा कोणी हे मनावर घेतलं नाही. या प्राण्याच्या प्रजनन क्षमतेची कल्पना असल्यानं हा भविष्यासाठी धोका असल्याचं बोलूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावेळी तर बिबट सफारी मागितली होती…. आता ही संख्या वाढली असून, सामान्यांचं आयुष्य धोक्यात आली आहे. शेतात जायलाही शेतकरी घाबरत असून जीवाच्या भीतीनं कोण घराबाहेर पडत नाहीये. दिवसा, रात्री, पहाटे हल्ले होत आहेत, रेस्क्यू सेंटर हाएकच मार्ग त्यावर आहे’, या मतावर ते ठाम दिसले.
