Download App

MLA Disqualification प्रकरणी मोठी अपडेट; वेळापत्रक पुन्हा बदलले, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

  • Written By: Last Updated:

MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता गेल्या कित्येक महिन्यांपासून लांबणीवर पडत असलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल झाला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या संमतीने शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे.

एमआयडीसीवरुन राजकारण तापलं; तरुणांच्या भवितव्याशी खेळू नका, रोहित पवारांचा हल्लाबोल

शिवसेनेच्या आमदार पात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरला सुरू होणार आहे. तर 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत हे सुनावणी पूर्ण होणार असल्याचे देखील सांगण्यात येते. दरम्यान उद्यापासून पुढील तीन दिवसात शिंदेने ठाकरे दोन्ही गटाच्या वकिलांना लेखी उत्तर सादर करावं लागणार आहे.

Winter Session : राज्याच्या तिजोरीवर 83 हजार कोटींचा भार; अजितदादांनी सांगितला तूट भरून काढण्याचा फॉर्म्युला

दरम्यान गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवसेनेच्या आमदार अपात्रता हे प्रकरणावरची सुनावणी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ताशेरे ओढले होते. त्याचबरोबर नार्वेकरांना या प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबरच्या पर्यंत देणे बंधनकारक केला आहे. त्यामुळे सध्या सुनावणीला वेग आलेला आहे.

काल (11 डिसेंबर) शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उलटतापसणीत अनेक धक्कादायक खुलासे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबतही वक्तव्य केले. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केसरकरांना कठोर शब्दांत फटकारले आहे. बाळासाहेबांबद्दल या लोकांच्या मनात प्रेम नाही. बाळासाहेबांनाच आता खोटं ठरवण्याचं काम केसरकरांनी उलट तपासणीत केलं, असा घणाघात परब यांनी केला.

Tags

follow us

वेब स्टोरीज