Download App

जलजीवनचा पैसा थकल्याने कंत्राटदाराची आत्महत्या, निलेश राणे म्हणाले, ‘संबंधित विभागाशी…’

ठेकेदाराने लोकप्रतिनिधींना भेटलं पाहिजे, त्यांचे नेमके कुठले पैसे अडकले आहेत ते सांगितलं पाहिजे. तसेच या प्रकरणी संबंधित खात्याशी चर्चा करू

  • Written By: Last Updated:

Nilesh Rane Harshal Patil Suicide Case : जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षल पाटी (Harshal Patil) यांनी मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांचे शासनाकडे सुमारे दीड कोटी रुपयांचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा कंत्राटदार संघटनेने (Contractors Association) केला आहे. या घटनेमुळे सरकारविरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं. यावर आता शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) भाष्य केलं.

एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा 

निलेश राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हर्षल पाटील प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, ठेकेदारांचा जो काय विषय असेल त्यासंदर्भात त्यांनी आम्हाला भेटावं. इतर लोक भेटतात, ठेकेदाराने भेटलं तरी काही हरकत नाही. ठेकेदाराने लोकप्रतिनिधींना भेटलं पाहिजे आणि त्यांचे नेमके कुठले पैसे अडकले आहेत ते सांगितलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच या प्रकरणी संबंधित खात्याशी चर्चा करू, असंही राणेंनी म्हटलं.

यावेळी राणेंनी विनायक राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. विनायक राऊत यांची रिटायरमेंट जवळ आली आहे. त्यांना लोकांनी रिटायर केले आहे, पण ते स्वतःहून मान्य करत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत रत्नागिरीत शिवसेनेची ताकद काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ, असं राणे म्हणाले.

सर्पमित्रांना 10 लाखांचा विमा अन् फ्रंटलाइन वर्करचा दर्जा; मंत्री बावनकुळेंची CM फडणवीसांना शिफारस 

संजय राऊतांनी हनी ट्रॅपविषयी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता राणे म्हणाले, संजय राऊत यांच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. संजय राऊत म्हणजे महाराष्टाचे प्रवक्ते आहेत का? हनी ट्रॅप हा सभागृहात शेवटच्या दिवशी चर्चेला आलेला विषय होता. हनी ट्रॅपमध्ये काँग्रेसाच नेता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्र्यानी हे स्पष्ट केलं आहे. त्याची आता चौकशी पोलीस करतील. पोलीस तपासात सर्व उघड होईलच, असं राणे म्हणाले. तसेच विधिमंडळात ज्यावेळी हनी ट्रॅपवर चर्चा झाली, त्यावेळी त्यावेळी संजय राऊत कुठे तरी फुकत बसले असतील, असा टोलाही राणेंनी लगावला.

 

follow us