MLA Sangram Jagtap Meet Ajit Pawar : हिंदुत्ववादी अजेंडा आणि विशिष्ट धर्म समुदाय याबाबत आमदार जगताप (Sangram Jagtap) यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आमदार जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तसेच आमच्या काय भावना आहे, आमची काय भूमिका आहे, याबाबत अजित पवारांशी बोलणं झालेलं आहे. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आमची भूमिका मांडली, असे यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले.
हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विशिष्ट समुदायाबाबत कठोर भूमिका घेतली, असा आरोप करत त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडून वरिष्ठांकडे जगताप यांच्या विरोधात तक्रार करण्यात (Maharashtra Politics) आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करणार असे सांगितले होते.
MPSC मध्ये नवे चेहरे, नव्या जबाबदाऱ्या! अनुभवी सदस्यांमुळे मुलाखतींना मिळणार बूस्टर
अजित पवारांची भेट
मात्र आषाढी वारी सुरू असल्याने दिंडी आणि वारकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने आमदार जगताप अन् अजित पवार यांची भेट झाली नव्हती. दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे सुरू झाले . आमदार जगताप देखील अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली आहे. लेट्सअप मराठीशी संवाद साधताना आमदार जगताप म्हणाले दिंड्यांच्या कारणास्तव माझी अन् अजित पवारांची भेट झाली नाही, याबाबत त्यांना निरोप दिलेला होता. आमचं मत अन् आमची भूमिका याबाबत अजित पवारांशी चर्चा झालेली आहे. याबाबत सविस्तर गोष्टी अजितदादा बोलतील, असं देखील यावेळी बोलताना जगताप म्हणाले.
जगतापांचा हिंदुत्ववादी अजेंडा
मी अजित दादांसमोर माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना खुश करण्याचा किंवा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला नाही, असं जगताप म्हणाले. जगतापांचा हिंदुत्ववादी अजेंडा याचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं. यावर बोलताना जगताप म्हणाले की, प्रत्येक पक्षाचे मत मतांतर असतं. मात्र, हा त्यांचा व्यक्तिगत विषय असतो. त्यामुळे याचा कोणीही अर्थ जुळवण्याचा प्रयत्न करू नये, असे देखील यावेळी जगताप म्हणाले.
“राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच..”, भास्कर जाधवांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवरील टीकेचे पडसाद
कोणतीही जातीय तेढ निर्माण झाला नाही पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. तसेच मतदारसंघात कोणीही चुकीची भूमिका घेऊ नये. आपले नेते अजित दादा आहे. त्यांच्याच विचारांशी आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. मुंबईतील काही नेत्यांकडून आक्षेपार्ह बोलले गेले. त्यामुळे नगरच्याही काही कार्यकर्त्यांकडून वक्तव्य केली गेली. मात्र, ती केली जाणार नाही. याबाबत त्यांना समज दिलेली आहे. तसेच अजित पवारांनी एकदा बोलले की, इतरांनी बोलण्याची गरज नाही अशा शब्दांत एकंदरीत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे कानही टोचले आहेत.