Download App

‘आमच्यासारखे कार्यकर्ते स्वागतच करतील…’ अजित पवारांच्या शिलेदाराकडून जयंत पाटलांना खुली ऑफर

MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. यानंतर जयंत पवार (Ajit Pawar) यांना मोठी ऑफर आल्याची माहिती मिळतेय.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर जयंत पाटील अजित पवार गटात आले, तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील. जयंत पाटील हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ आहेत, असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आहे.

जयंत पाटील भाजपात जाणार? प्रश्न विचारताच रोहित पवार म्हणाले, सत्तेसाठी ते…

जयंत पाटलांचा राजीनामा

ज्या वेळी जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नव्हते. तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील (Maharashtra Politics) विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा त्यांचा आरोप होता. अस्वस्थतेमुळेच जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, राजकीय चर्चा अशीच असल्याचं देखील जगताप यांनी नमूद केलं.

या विधानातून स्पष्ट झाले आहे की, अजित पवार गटात जयंत पाटील यांच्याबद्दल अजूनही अधूनमधून चर्चा सुरू आहेत. काही अजित गटाचे नेते त्यांच्या नवीन भूमिकेला सकारात्मक दृष्टीकोनाने पाहत आहेत. संग्राम जगताप यांचा उल्लेख यामुळे या राजकीय फेरबदलांचे आणखी राजकीय परिणाम दिसू लागतील. अजित पवारांनी मात्र याप्रकरणी भाष्य करणं टाळलं असल्याचं समोर आलंय.

त्याच्या मित्रांना बोलवायचा अन् माझ्यासोबत संबंध…, निमिषाची महदीबद्दल धक्कादायक माहिती

अजित पवार गटाकडे प्रवास?

शरद पवार अन् अजित पवार गटातील विभाजन यामुळे राजकीय समीकरणं अगोदरच बदलली आहेत. जयंत पाटील यांच्या निर्णयामुळे या दोन्ही गटांमध्ये दबाव वाढलाय.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिक्रियेतून असा स्पष्ट संकेत मिळतो की, जयंत पाटील अजित गटात जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे विरोधकांना बळ मिळू शकते. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटाकडे त्यांचा प्रवास होईल की नाही, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

 

follow us