Download App

Video : संतोष देशमुखांचा दुसरा पार्ट होता-होता वाचला; आमदार धस परळी प्रकरणावर काय म्हणाले?

याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. आज आंबेजोगाई येथे पीडित शिवराज दिवटे व दिवटे कुटुंबीयांची भेट

Suresh Dhas On Youth Beaten up in Parlai : बीड जिल्हा आणि त्यातही प्रामुख्याने परळी शहरात कायम खून, मारहाण अशा घटना घडत आहे. आता नुकतीच परळीत एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली. (Dhas) याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. आज आंबेजोगाई येथे पीडित शिवराज दिवटे व दिवटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देणार आहेत अशी माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

जनतेतून धिंड काढावी

यावेळी धस म्हणाले, आरोपींवर मकोका लावा, अल्पवयीन मुलांवर पोरशे कार प्रकरणाचा धागा पकडून कारवाई करा, अशी मागणी मी एसपींकडं करणार आहे. त्याचबरोबर पोलिसांनी जे चुकीचे वागतील त्यांची जनतेतून धिंड काढावी. त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत.  सरपंच देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले आहे, तीच सगळी भाषा शिवराज दिवटे प्रकरणात आहे, असंही धस यांनी यावेळी म्हटलं आहे.

त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलाव

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बीडमध्ये येत आहेत. त्यांनी बैठकीपूर्वी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलावं. हे सत्र बंद व्हायला तयार नाही, पोलिसांनी आरोपींची धिंड काढावी. त्याशिवाय हे थांबणार नाही. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्यावर मकोका लावावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

follow us