पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई, 43 पुरुष अन् 26 महिलांची सुटका तर 16 बीएलए सैनिक ठार

पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई, 43 पुरुष अन् 26 महिलांची सुटका तर 16 बीएलए सैनिक ठार

Pakistan Train Hijack:  पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्याजवळ मंगळवारी धक्कादायक घटना घडली. दहशतवाद्यांनी क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनला हायजॅक (Pakistan Train Hijack) करुन गोळीबार केला. या गोळीबारात अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे तर अनेक जण जखमी देखील झाले आहे.

तर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार,  पाकिस्तानी सैन्याने मोठी कारवाई करत बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) चे 16 दहशतवाद्यांना ठार केले आहे तर 100 हून अधिक प्रवाशांची सुटका केली आहे. याबाबत सामा टीव्हीने माहिती दिली आहे.  समा टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून बीएलए सैनिक आणि पाकिस्तानी सैन्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात अनेक प्रवासी जखमी झाले आहे.

तर दुसरीकडे रेडिओ पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आतापर्यंत दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या 104 लोकांना सोडवले आहे. माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये 43 पुरुष, 26 महिला आणि 11 मुले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या करावाईमुळे दहशवादी लहान लहान गटात विभागले गेले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बीएलए सैनिकांकडून सोडवण्यात आलेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

तर बलुचिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले की, दुपारी एका दुर्गम भागात ट्रेनला हायजॅक करण्यात आले आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर काही प्रवाशांना सोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सुटका केलेल्या प्रवाशांना जवळच्या स्टेशनवर नेण्यात येत होते. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच अनेक लोकांना ट्रेनमधून उतरवून डोंगराळ भागात नेण्यात आले आणि अतिरेक्यांकडून महिला आणि मुलांचा ढाल म्हणून वापर येत आहे. असं देखील ते म्हणाले.

आंबेजोगाई रोडवर तरुणाला जबर मारहाण; अवघ्या 3 तासांत पोलिसांनी ठोकल्या 4 आरोपींना बेड्या, काढली वरात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube