आंबेजोगाई रोडवर तरुणाला जबर मारहाण; अवघ्या 3 तासांत पोलिसांनी ठोकल्या 4 आरोपींना बेड्या, काढली वरात

Young man severely beaten on Ambajogai Road : राज्यात अनेक दिवसांपासून गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढलं आहे. अशातच लातुर (Latur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर (crime news) आलीय. पार्थ हॉटेल शेजारी आंबेजोगाई रोड येथे तरूण युवकाला जबर मारहाण करण्यात आलीय. या घटनेत एकजण जखमी (Ambajogai Road) असल्याची माहिती मिळतेय.
चार तासांपूर्वी लातूरमधील आंबेजोगाई रोडवर एका 35 वर्षीय व्यक्तीला पाच लोकांनी बेदम मारहाण केली होती. रस्त्यावर झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ काही वेळातच लातूरमध्ये व्हायरल झाले होते. या घटनेनं लातूर शहर हादरलं (man severely beaten on Ambajogai Road) होतं. यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासातच कारवाई करत या घटनेतील पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी मारलं होतं, तिथूनच मारत त्यांची धिंड शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली.
AI थेट रस्त्यावर! पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठा तोडगा, विधानसभेत महत्वाचा निर्णय
या घटनेमुळे शहरात मोठं दहशतीचं वातावरण आहे. तर दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी मारहाण केली होती, त्या ठिकाणाहून आरोपींची धिंड काढण्यात आलीय. त्यानंतर या आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक देखील बरोबर होतं. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना जेरबंद केलंय.
https://x.com/LetsUppMarathi/status/1899508341740908762
विधान परिषदेसाठी माधव भंडारींसह भाजपची तीन नावं दिल्लीत; शिंदे-अजित पवारांना एक-एक जागा
राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. गरिबी, बेरोजगारी, दारू आणि ड्रग्जचे बेसुमार सेवन यासारखे सामाजिक-आर्थिक घटक यामागे कारणीभूत आहेत. कायद्यातून मिळणारी सुट आणि पळवाटा यामुळे गुन्हा करताना कोणतीही भीती राहत नाही, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. विधीसंघर्षीत बालकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. गुन्हेगारी करताना छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून परिसरात दहशत माजवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.