Download App

MLC Election : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार? आज होणार पिक्चर क्लिअर

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

MLC Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या (MLC Election 2024) आधी राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत आता चुरस वाढू लागली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी (Milind Narvekar) अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे निवडणूक होणार की उमेदवार बिनविरोध निवडले जाणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

मविआचा प्लॅन उलटणार की महायुतीला धक्का देणार? विधानपरिषदेचं गणित कुठे फसणार..

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका जरी उमेदवाराने माघार घेतली तरी निवडणूक बिनविरोध होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या कामी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. विधानसभेत सध्या 288 पैकी 274 आमदार आहेत. त्यामुळे विजयासाठी 23 (22.84) मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

मविआच्या डावाने शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट; माघार की घोडेबाजार, शुक्रवारीच फैसला

महायुतीतही अडचणी कमी पण, फाटाफुटीचे टेन्शन

त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही.

शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. या उमेदवारांनाही विजयासाठी सात अतिरिक्त मते मिळवावी लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांंनाही अतिरिक्त मते मिळवण्यासाठी जास्त तजवीज करावी लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

मविआचं संख्याबळाचं गणित

काँग्रेसचे 37 मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त राहतील. आता ही 14 मते ठाकरे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसची ही मते मिळाली तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार मिलींद नार्वेकर निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचाही अर्ज आहे. परंतु, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे फक्त एकच मत आहे. शरद पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. याशिवाय सपा आणि माकपाची तीन मते जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागणार आहेत.

follow us