Download App

प्रकाश महाजनांनी ठाकरेंच्या ‘मातोश्री’चे बिंग फोडले…

मुंबई : मनसे नेते प्रकाश महाजनांनी ठाकरेंच्या मातोश्रीचे बिंग फोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मातोश्रीच्या एफएसआयचे प्रश्न कोणी सोडवले? याबाबत स्पष्टच सांगितलंय. मातोश्रीच्या FSI साठी फडणवीस फुल होते ते आता फडतूस झाले असल्याचा उपरोधिक टोला महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

तुमचे आधार कार्ड जुने झाले आहे? ही बातमी तुम्ही मग अवश्य वाचा…

तसेच देवेंद्र फडणवीसांना हे खरं होतं की खोटं हे जनतेला सांगावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. महाजन म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत होते.

पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची यादी

तेव्हा फडणवीस चांगले होते. त्यावेळी मातोश्रीच्या एफएसआयवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ते प्रश्न त्यावेळी फडणवीसांनी सोडवले असल्याचंही महाजनांनी सांगितलं.

जेव्हा मातोश्रीच्या एफएसआयवर प्रश्नचिन्ह होते तेव्हा फडणवीस फुल होते, आता ते फडतूस झाले असल्याचा टोला महाजन यांनी लगावला आहे. त्यासोबतच देवेंद्रजी सांगताहेत की मी काडतूस आहे तर मग फडणवीसांनी गोळ्या माराव्यात, जनतेलाही समजू द्यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

फडणविसांनी ठाकरेंवर भावासारखं प्रेम केलं : बावनकुळे असं का म्हणाले?

फडणीसांना उद्धव ठाकरेंनी फडतूस म्हटल्यानंतर फडणवीस मला बरंच माहित असल्याचं सांगत आहेत. तर मग जे काय आहे ते फडणवीसांनी बोललं पाहिजे, आणि याबाबत जनतेलाही समजलं पाहिजे असंही महाजन यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तरात मी फडतूस नाहीतर काडतूस असल्याचं म्हटलं होतं. त्यावर महाजन म्हणाले, तुम्ही खरंच काडतूस आहात तर मग एखादी गोळी मारा, असं महाजन म्हटले आहेत.

Tags

follow us