तुमचे आधार कार्ड जुने झाले आहे? ही बातमी तुम्ही मग अवश्य वाचा…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (46)

पुणेः तुमचे आधारकार्ड तब्बल वीस वर्षांपूर्वी काढलेले असेल.ते आता अपडेट करावे लागणार आहे.त्यासाठी सरकारी सुट्टीच्या दिवशी आधार सेवा सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

ज्या नागरिकांनी २०१२ पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे. परंतु मागील १९ वर्षांमध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही अशा नागरीकांनी त्यांचे आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. सदयस्थितीत पुणे जिल्ह्यात ३० लाख २६ हजार ८२३ इतक्या नागरीकांचा आधार तपशील अद्ययावत करणे प्रलंबित आहे. आधार अद्ययावतीकरणाला वेग देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईसाठी सर्व आधार सेवा केंद्रे शासकीय सुट्टीच्या व साप्ताहिक दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

विशेष मोहिम म्हणून १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये तालुका, मंडल, क्षेत्रिय कार्यालय स्तरावर ‘आधार डॉक्युमेंट अपडेट पंधरवडा’ राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. माय आधार ॲप आणि आधार संकेतस्थळावर अद्ययावतीकरण १४ जूनपर्यंत मोफत
‘माय आधार’ ॲप आणि आधार संकेतस्थळाचा वापर करायचा आहे.

नागरिक आपले आधारमधील नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, भाषा अद्ययावत करु शकतात. आधार सेवा केंद्रामध्ये आधार तपशील अद्ययावतीकरणासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागते. मात्र, या ॲप व संकेतस्थळावरुन १४ जून २०२३ पर्यंत नागरिकांनी स्वत: आधार अद्ययावतीकरण केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय शुःल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Tags

follow us