MNS Leader Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut : महाराष्ट्रात महापालिका (Maharashtra Politics) निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशा प्रकारच्या हालचाली दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे. जनभावना देखील आहे मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संदीप देशपांडे यांना राजकारणात नवीन असल्याचे काल बोलले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी माध्यमातून राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अमेरिकेने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाइट हॅमर; जेट्स भारतातून गेली का? सत्य काय?
टि्वटच्या माध्यमातून जहरी टिका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांना डीवचले आहे. होय, आम्ही नवीन आहोत. पण, कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही, आम्हाला अभिमान आहे. आम्ही नवीन आहोत, तुम्ही जुने असून काय उपटली? असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टिका केली आहे.
इराण-इस्रायल युद्ध; अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये इराणच्या अणू केंद्रांची राखरांगोळी
शाब्दिक युद्ध थांबेना
मनसे आणि ठाकरे शिवसेना युतीबाबत स्थानिक पातळीवर हलचाली सुरु आहेत. असे असताना संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही. संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांचा ताटातील चमचा, असा उल्लेख केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांना कडक भाषेत टिका केली होती. राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो, तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे, काय होणार नाही? हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्या सारखं, त्याला अर्थ नाही असं राऊत यांनी म्हटलं होतं.
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत,जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही .मुस्लिमांची मत मिळवण्या साठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 23, 2025
शिवसेना – मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना ब्रेक
संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यातील एकामेकांविरोधातील शाब्दिक चकमकीमुळे ठाकरे शिवसेना – मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागू शकतो. अशा प्रकारचे अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून या दोघांना टीका करण्यापासून कोण थांबवतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.