Sandeep Deshpande : वीरप्पनपेक्षा जास्त प्रमाणात यांनी मुंबई महापालिका लुटली, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
आम्ही गेले 5 वर्ष बोलत होतो. वीरप्पन गँगने पालिका लुटण्याचं कामं केलं आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं कामं कॅग ने केलं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेचे स्वतःच ऑडिट खातं आहे. त्यात ७०० लोकांचा स्टाफ आहे. मग घोटाळा होत असताना महापालिकेचं ऑडिट खातं झोपा काढत होत का? असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आज विचारला आहे.
ऑडिट करताना त्यांना अनियमिता दिसली का नाही? त्यामुळे याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. याच्यावर एफआयआर नोंदवली पाहिजे. संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी यावेळी देशपांडे यांनी केली.
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; हर्षवर्धन पाटलांचा ठाकरेंवर निशाणा
कॅगने मिठी नदीच्या टेंडरवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की गेल्या काही वर्षात आम्ही सातत्याने या गोष्टी मांडल्या आहेत. मिठी नदीचं सफाईकरण हाच सगळ्यात मोठा घोळ आहे. आमचं म्हणणं होत की तिथे सफाई होत नाही. आमची मागणी होती की सीसीटीव्ही लावा, मग तिथे सीसीटीव्ही का लावली गेली नाही. असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
वीरप्पनपेक्षा जास्त प्रमाणात यांनी मुंबई महापालिका लुटली
या सगळ्या पाठीमागे ही सगळी वीरप्पन गँगची खेळी आहे. त्यांच्या पाठी त्यांचाच हात आहे. त्यामुळे मी म्हणतो वीरप्पनने जंगलात जेवढं लुटलं नसेल त्यापेक्षा जास्त यांनी मुंबई महापालिका लुटली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
काल उद्धव ठाकरे यांनी नाशिक सभेत राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. त्यावर बोलताना देशपांडे म्हणाले की ही सगळी मॅच फिक्सिंग आहे. सावरकरांबद्दलचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नक्की काय करणार, असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचाराला.
ते पुढे म्हणाले की उद्या पुन्हा राहुल गांधी बोलले तर पुन्हा सामनामध्ये फक्त अग्रलेख लिहिणार का? घरी बसून अंडी उबवणार का? तुम्ही राहुल गांधी यावर कारवाई काय करणार. याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी मधून बाहेर पडणार का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
मनसे-शिवसेना यांची मन जुळणार
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावर आगामी काळात मनसे-शिवसेना यांची युती होणार का? या प्रश्नांवर ‘माहित नाही’ अशी संदिग्ध प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली.
सोमय्यांनी केला 12 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यपालांनी दिला ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार