Download App

अंधारेबाई, यापुढे याद राखा…! शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना कडक शब्दांत इशारा

Shalini Thackeray Vs Sushma Andhare : राज्यात नूकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजे, लेझर लाईटच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ताशेरे ओढले होते. यासंदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडीयावर पोस्टही शेअर केली होती. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या मुद्द्यावरुन आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंना कडक शब्दांत इशाराच दिला आहे. अंधारेबाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत कडक इशाराच शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं होतं. त्यावरुन राज ठाकरेंनी पोस्टही शेअर केली. त्यावरून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल. फक्त दुपारी उठून कसं चालेल? यावर बोललं पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

मोदी सरकारची मोठी घोषणा, आता केवळ 600 रुपयांत मिळणार LPG सिलिंडर

शालिनी ठाकरे म्हणाल्या, “काही हिंदू सणांमध्ये डी. जे. व लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी त्याला विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेनं, सर्वपक्षीय संवेदनशील व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं. पण हेच तुम्हाला बहुधा रुचलं नसावं. राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात. कुटुंबाला राजकारणात ओढण्याची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच मग तुमच्यासारखे चेले-चपाटे मागे कसे राहतील?” असा सवाल शालिनी ठाकरेंनी पत्रातून केला आहे.

अजितदादांचे इजा, बिजा, तिजा… : नाराजी लक्षात येताच शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना

शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात त्यामुळेच तुम्ही संबंध नसताना राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढलं. हे निंदनीय व निषेधार्ह आहे. आपण याची जाहीर माफी मागितली पाहिजे. आपल्यालाही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कुणी अशी विधानं केली तर ती तुमच्या मनाला रुचतील का? असंही शालिनी ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाची मुलूखमैदानी तोफ म्हणून सुषमा अंधारेंनी ओळख निर्माण केली आहे. सत्तासंघर्षानंतर अंधारे यांनी राज्यभरात महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून भाजप-शिंदे गटावर चांगलीच टीकेची तोफ उठवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता शालिनी ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अंधारे काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us