Download App

राज ठाकरेंचा 15 दिवसांत यु-टर्न : प्रामाणिक वाटणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनातून आता ‘राजकारणाचा वास’

Image Credit: Letsupp

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरं कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? कालांतराने या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून राजकारणाचा वास येत असल्याचा आणि जातीय वाद भडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (MNS president Raj Thackeray said that politics in Manoj Jarange Patil’s agitation)

काय म्हणाले राज ठाकरे?

मूळात या प्रकारचे कोणतही आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर सांगून आलो होतो. मी कोणतीही नवीन गोष्ट सांगत नाही. आता हे जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागून कोणीतरी बोलत आहे, ज्याच्यातून जातीयवादाच्या माध्यमातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी सुरु होत आहेत, हे काही मला इतके सरळ चित्र दिसत नाही. पण कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनातून राजकारण करण्यात येत असल्याचा आणि जातीय वाद भडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद : राज ठाकरेंनी पुन्हा जुन्या वादाला फोडलं तोंड

राष्ट्रवादी जातीयवादी :

जात ही अशी गोष्ट आहे जी अनेकांना प्रिय असते. अनेकांना आवडते. याची कारणे वेगळी आहेत. आपल्या जातीचा अभिमान बाळगण्याचे प्रकार महाराष्ट्रात आधीपासून होत होते. महाराष्ट्रात जात होतीच. हजारो वर्षापासून जात आहे. मात्र, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर स्वतःच्या जातीऐवजी इतर जातींबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला.

राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातींचा द्वेष वाढला. मी अनेकदा बोललो की, असंच होत राहिलं तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही. राजकीय नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्र खड्ड्यात ढकलला जात आहे. महाराष्ट्राची देशभर एक प्रतिमा आहे, त्या प्रतिमेची वाट लावण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

अदानींचे माजी सल्लागार केंद्राच्या मंजुरी समितीत; महाराष्ट्रातील बड्या प्रकल्पाला ‘वायुवेगाने’ मान्यता

15 दिवसांपूर्वीच केले होते कौतुक :

दरम्यान, 15 दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना जाहीर पत्र लिहून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. तर जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांना  खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य नाही, असे म्हणत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काही दिवसांत उपोषण मागे घेतले होते. मात्र आता याच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून राजकारणाचा वास येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तीच भाषा जरांगेंच्या तोंडी’; भाजप नेत्याचा शरद पवारांकडे रोख?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही, हे अवघ्या जगाला ठावूक आहे. पण, तरीही असा प्रचार शरद पवार गटाकडून नेहमीच केला जातो. आता तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्या सांगण्यावरुन हे बोलत आहेत, अशी शंका येते. कुणाच्या राजकीय बंदुकीला त्यांनी आपला खांदा वापरु देऊ नये, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे मत काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज