Mob attacks house in Ahilyanagar; CCTV footage of Heavy fighting emerges : गेल्या काही दिवसांपासून राज्याभरामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात असलेल्या म्युनिसिपल कॉलनीतील घरावर जमावाने काल (ता. २४) हल्ला केला होता. या हल्ल्याचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात जमावाकडून एका घरावर हल्ला केला जात असल्याचे दिसत आहे.
माझं गुलाबी गप्पांचं वय नाही, पण तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्या… महाजनांवर टीका, खडसेंची जीभ घसरली
दिल्लीगेट परिसरातील म्युन्सिपल कॉलनीत गुरूवारी (24 जुलै) दुपारी दोन गटांत राडा झाला. यात महिलांसह तरूण जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याचे सांगितले जात असून यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
PM मोदींची ऐतिहासिक झेप! इंदिरा गांधींचा विक्रम पार केला, सर्वात जास्त काळ सत्तेवर…
म्युन्सिपल कॉलनीत पवार-रोहकले हे दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात हाणामारीची घटना होऊन वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाकडून दुकानावरही दगडफेक करण्यात आली. हाणामारीत दोन्ही गटांतील महिलांसह तरूण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलीस प्रशासन कुचकामी…शहरात गुन्हेगारी वाढली
नगर शहरात दर दिवशी हाणामारी, लूटमार, वाढती गुन्हेगारी पाहता शहरासह जिल्ह्यात पोलीस प्रशासनाची कामगिरी कमकुवत होत असल्याचे अधोरेखित होत आहे. हप्तेखोरी व चिरीमिरी कारवाईमध्येच पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचे दिसते आहे. पोलीस प्रशासनाचा धाक हा गुन्हेगारांना राहिला नसल्याने गुन्हेगारी घटंनामध्ये वाढ होत असल्याचे दिसते आहे.