Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या सहजीवन व्याख्यानमाला कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. (Mohan Bhagwat) तसंच, त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरे असल्याचा दावा करण्यावर सडेतोड भाष्य केलं.
राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कुणी हिंदूंचा नेता; मोहन भागवत यांचं मोठं विधान
कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरे असल्याचा उठसूट दावा करणं अस्वीकारार्ह असल्याचं राष्ट्रीय सव्यंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. वेगवेगळ्या धर्मीयांना तसंच विचारधारांना सलोख्याने भारतात राहण्यासाठी योग्य वातावरण तयार व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच, भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल, कारण भारताची निर्मितीच परोपकारासाठी झालीय असं त्यांनी सांगितलं.
ते योग्य नाही
आगामी वीसेक वर्षात भारत विश्वगुरु होईल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं असं हिंदूना वाटायचं. त्याप्रमाणे राम मंदिर पूर्णही झालं. मात्र राम मंदिर झालं म्हणजे नेता होता येत नाही, असंही त्यांनी बजावलं. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले. देशात अल्पसंख्य किंवा बहुसंख्य असं काही नाही, सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळायला हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र
भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालंय. इतरांच्या देवी दैवतांचे हाटाळणी करू नये. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण असं झालं म्हणजे नेता होता येतं, असं नाही. आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लक लाभो. पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही. आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.