Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने मोठा निर्णय घेत भारतात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना निर्देश देत राज्यात पाकिस्तानी नागरिक शोधण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या निर्देशानंतर राज्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात पाच हजार पेक्षा जास्त नागरिक आहे.
माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहे. नागपूरात 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले आहे तर ठाण्यात 1 हजार 106 नागरिक आढळून आले आहे तर मुंबईमध्ये 14 पाकिस्तानी नागरिक राहतात अशी माहिती समोर आली आहे. या नागरिकांपैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्रं मिळाली आहेत तर 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याचा सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानवर सरकारकडून कठोर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
अकोला – 22
अहिल्यानगर -14
अमरावती (सी)- 118
छत्रपती संभाजीनगर (सी )- 59
बुलढाणा – 7
धुळे – 6
गोंदिया – 5
जळगाव – 393
जालना – 5
कोल्हापूर – 58
लातूर – 8
मुंबई -14
नागपूर – 2458
नांदेड 4
नंदुरबार – 10
नवी मुंबई – 239
पिंपरी चिंचवड – 290
पुणे – 114
मोठी बातमी! राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार
ठाणे- 1106