Moshi Incident : पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील महापालिका कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशाकीय इमारतीवर बुधवारी (8 जुलै) दुपारी कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही इमारत तीन मजली असून यामध्ये तळमजल्यावर पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तर पहिल्या मजल्यावर कॅन्टिंग आणि दुसऱ्या मजल्यावर काॅन्फरन्स हॉल आहे.
बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये 23 कामगार होते त्यापैकी 5 कामगार दुसऱ्या मजल्यावरुन बाहेर पडले. प्रशासनाकडून (Pimpri Chinchwad) बचाव कार्य सुरु असून मध्यरात्री तीन पर्यंत 9 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इतर कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मध्यरात्री साउंड व्हायब्रेशन टेस्ट (Sound Vibration Test) वापरण्यात आले.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या हृदयाचे ठोके सुरु आहेत का? हे तपासण्यासाठी साउंड व्हायब्रेशन टेस्ट सिस्टीम वापरण्यात आली होती मात्र या टेस्टिंग दरम्यान आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? महासचिव विनोद तावडेंनी घेतली भेट-
तर दुसरीकडे सलग सहा तास इमारतीच्या बाजूला साचलेले कचऱ्याचे ढीग कमी करण्याचे काम सुरु होते. आज सकाळी 8.30 च्या सुमारास जवानांनी पहिल्या मजल्याच्या भिंतीला छिद्र पाडले असून आता 9 ते 10 जवानांनी कॅन्टिंगमध्ये प्रवेश केला आहे. अनेक कामगार कॅन्टिंगमध्ये असण्याची शक्यता असल्याने 9 ते 10 जवानांकडून कॅन्टिंगमध्ये शोधमोहिम राबवण्यात येत आहे.
